मुक्तपीठ टीम
कॉर्पोरेट क्षेत्रातील काही कंपन्या या त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून त्यांना अधिक उत्साही आणि कौशल्यशाली बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्या अनेक वेगळ्या कल्पना राबवतात. व्यावसायिक सोशल नेटवर्क कंपनी ‘लिंक्डइन’ने आपल्या कर्मचार्यांवर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या लिंक्डइनने जगभरातील आपल्या १५,९०० कर्मचार्यांना एका आठवड्यासाठी पेड लीव्हवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ५ एप्रिलपासून कंपनीचे १५,९०० कर्मचारी एकत्र रजेवर असतील.
या निर्णयाच्या कारणामागील माहिती देताना, लिंक्डइन प्रमुख म्हणाले की, कंपनीसाठी कठोर परिश्रम घेतलेले कर्मचारी काही काळ चांगला वेळ घालवू शकतील जेणेकरून ते कामावर परत येतील तेव्हा ते पूर्ण ऊर्जा आणि उत्साहाने कामावर परततील आणि काम करतील. यावेळी, कर्मचार्यांची एक कोर टीम कार्यरत राहील. एका आठवड्यानंतर, जेव्हा कर्मचारी परत येतील तेव्हा या कोअर टीममधील लोकांना सोडण्यात येईल.
‘लिंक्डइन’ लवकरच ऑडिओ चॅटिंगचा फीचरही सुरू करणार आहे. आजकाल जगभरात ऑडिओ चॅटिंग हा एक नवीन ट्रेंड होत आहे. लिंक्डइन त्यांच्या ७४ कोटींहूनही अधिक सदस्यांसाठी अशाच अॅपवर काम करत आहे. कंपनीचा असा दावा आहे की ते एका ऑडिओ नेटवर्किंग सुविधेवर काम करत आहे जे व्यावसायिकांना अधिक चांगला ऑडिओ अनुभव देईल.
पाहा व्हिडीओ: