मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सुचवलेल्या ९९ नावांपैकी फक्त एका नावाची निवड केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १०० मान्यवरांची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचवली होती. केंद्रातील मोदी सरकारने त्यातील फक्त एकच नाव निवडले. ते म्हणजे सिंधुताई सपकाळांचे. राज्यातून पद्म पुरस्कार मिळालेल्या ६ पैकी ५ जणांची निवड केंद्र सरकारने थेट केली असल्याचे कळते.
दर वर्षी पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकार केंद्र सरकारला विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे पाठवत असते. त्यांची संपूर्ण कर्तृत्व मांडणारी फाइल तयार केली जाते. राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने या वर्षाची नावे निवडली होती. अशा ९९ कर्तृत्ववान महाराष्ट्रीयनांची नावे केंद्राला पाठवण्यात आली होती. मात्र केंद्राने त्यापेकी फक्त सिंधुताई सपकाळांच्या नावाची निवड केली आहे.
त्या यादीतील ठाकरे सरकारने सुचवलेली काही नावे:
पद्म विभूषण
सुनिल गावसकर
दीपक पारेख (एचडीएफसी – बँकर)
मुकेश अंबानी
पद्मभूषण
अदर पुनावाला (सीरम इन्स्टिट्युट)
माधुरी दीक्षित
मेहव आगाशे
डॉ. मिलिंद किर्तने
शितल महाजन
पद्म पुरस्कारांसाठीची इतर नावे
वैद्यकीय
डॉ.जयंती शास्त्री
डॉ. मिनल दाखवे भोसले
डॉ. संजय ओक
डॉ. राहुल पंडित
डॉ. मुफझ्झल लकडावाला
डॉ. सुलतान प्रधान
डॉ. जगन्नाथ दीक्षित
रुजुता दीक्षित
डॉ. सुरेश भोसले
डॉ. हिंमतराव बाविस्कर
कलाकार
ऋषि कपूर
ह्रतिक रोशन
राणी मुखर्जी
रणवीर सिंह
जॉनी लिव्हर
दिलीप प्रभावळकर
अशोक सराफ
सुधीर गाडगीळ
विक्रम गोखले
इतर
अजिंक्य राहणे
संजय राऊत
आभा लांबा
अफ्रोज शाहयुवराज वाल्मिकी
उदय देशपांडे
प्रभात कोहली
अंजली भागवत
शंकर नारायण
स्मृति मंधाना
राज्य सरकारच्या शिफारशी नाकारते केंद्र?
गेल्या सात वर्षात राज्य सरकारने सुचवलेल्या नावांपैकी सहाजणांनाच पुरस्कार मिळाले आहेत. २०१५ ते २०१७ या तीन वर्षात प्रत्येकी एक नाव स्वीकारलं गेलं. २०१८मध्ये तीन नावांची निवड झाली होती.