Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पडळकरांना मारण्याचा खरंच कट की मिटकरी म्हणतात तसा पब्लिसिटी स्टंट?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
amol metkari and gopichand padalkar

मुक्तपीठ टीम

“सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक एस.पी मनिषा डुबुले हे हल्ल्याच्या कटात सामिल होते, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यावेळची एक व्हिडिओ क्लिप दाखवत आमदार पडळकर यांनी हा आरोप केला आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा हा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप करत त्यांचाच शरद पवार आणि जयंत पाटलांच्या बदनामीचा कट असल्याचे म्हटले.

 

काय म्हणाले पडळकर?

  • गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
  • कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला.
    पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.
    महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन.

 

पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारला

  • तो हल्ला आटपाटी पोलीस स्टेशनच्या दारात झाला आहे.
  • माझी गाडी ज्या दिशेनं येत होती त्याच्या विरोधी बाजूला २०० ते ३०० लोक उभे राहिले होते.
  • पोलीस बघत होते, शुटिंग करत होते.
  • मी थांबलो की माझा मर्डर करण्याचा प्लॅन होता.
  • पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यामुळं मी बॉडीगार्ड नाकारला.
  • हे सर्व प्रकरण सागंली जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान घडलं होतं.
  • सोलापूरमध्येही हल्ला झाला होता त्यावेळी अमोल मिटकरी यांनी तेच उत्तर दिलं होतं.
  • आता ज्यावेळी हल्ला तो आटपाडी पोलीस स्टेशनसमोरचा होता त्यामुळे यातील सत्य लोकांना माहिती आहे.

 

नेमकं काय घडलं होतं?

आटपाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून मारामारी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये हा राडा झाला होता. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासह दोन्ही गटातील १० लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय २९, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

 

तर राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आम्ही आंदोलन उभा केला आहे त्यामुळेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा प्रत्यारोप त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर

  • जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत्या.
  • शिवसेना आणि भाजपचे दोन पॅनेल होते.
  • गोपीचंद पडळकर यांचे दोन समर्थक तानाजी पाटील यांच्याकडे गेले.
  • याचा जाब विचारण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर गेले.
  • यावेळी राजू जानकर यांच्या अगांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  • चुका आपल्याच असताना आपल्याच समाजाच्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
  • शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या बदनामीचा प्रयत्न आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.

Tags: aatpadiamol metkariBJPCongressgopichand padalkarNCPsangliअमोल मिटकरीआटपाडीगोपीचंद पडळकरसांगली
Previous Post

पुणे झालं, कोकण झालं, आता जळगाव! शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना का रंगतो?

Next Post

भारतीय कोवॅक्सिन लसीला रोखण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रयत्न

Next Post
cji ramana alleged that mnc trying to stop covaxine

भारतीय कोवॅक्सिन लसीला रोखण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!