मुक्तपीठ टीम
“सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक एस.पी मनिषा डुबुले हे हल्ल्याच्या कटात सामिल होते, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यावेळची एक व्हिडिओ क्लिप दाखवत आमदार पडळकर यांनी हा आरोप केला आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा हा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप करत त्यांचाच शरद पवार आणि जयंत पाटलांच्या बदनामीचा कट असल्याचे म्हटले.
काय म्हणाले पडळकर?
- गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
- कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. - रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.
महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन.
पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारला
- तो हल्ला आटपाटी पोलीस स्टेशनच्या दारात झाला आहे.
- माझी गाडी ज्या दिशेनं येत होती त्याच्या विरोधी बाजूला २०० ते ३०० लोक उभे राहिले होते.
- पोलीस बघत होते, शुटिंग करत होते.
- मी थांबलो की माझा मर्डर करण्याचा प्लॅन होता.
- पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यामुळं मी बॉडीगार्ड नाकारला.
- हे सर्व प्रकरण सागंली जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान घडलं होतं.
- सोलापूरमध्येही हल्ला झाला होता त्यावेळी अमोल मिटकरी यांनी तेच उत्तर दिलं होतं.
- आता ज्यावेळी हल्ला तो आटपाडी पोलीस स्टेशनसमोरचा होता त्यामुळे यातील सत्य लोकांना माहिती आहे.
नेमकं काय घडलं होतं?
आटपाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून मारामारी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये हा राडा झाला होता. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासह दोन्ही गटातील १० लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर (वय २९, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
तर राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आम्ही आंदोलन उभा केला आहे त्यामुळेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा प्रत्यारोप त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.
अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर
- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत्या.
- शिवसेना आणि भाजपचे दोन पॅनेल होते.
- गोपीचंद पडळकर यांचे दोन समर्थक तानाजी पाटील यांच्याकडे गेले.
- याचा जाब विचारण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर गेले.
- यावेळी राजू जानकर यांच्या अगांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- चुका आपल्याच असताना आपल्याच समाजाच्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
- शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या बदनामीचा प्रयत्न आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.