मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार तसेच भाजपाचे नेते यांच्यात लसीकरणावरून जोरदार राजकारण सुरु आहे. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीट करत केंद्र सरकारला लसीकरणाबाबत चांगलेच खडसावले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आरशासमोर उभे राहून स्वत:ला विचारावं, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला आहे.
पी चिदंबरम यांनी ट्वीट करत केंद्रातील भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर वस्तुस्थिती जाणून न घेताच केंद्र सरकार महाराष्ट्राला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत ८०% आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे तर ७३ % फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले आहे, याचा त्यांनी उल्लेख केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात महाराष्ट्र देशात पाचवा आहे. ही सर्व आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीच आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का? असा प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारावा, या शब्दात पी.चिदंबरम यांनी केंद्रातील भाजप सरकारला खडसावले आहे.
केंद्र COVID-19 के प्रसार पर महाराष्ट्र को जटिल तथ्यों की अनदेखी कर टारगेट कर रहा है।
महाराष्ट्र ने 80 फ़ीसदी स्वास्थ्य कर्मचारियों का टीकाकरण किया है, लगभग 20 राज्य महाराष्ट्र से पीछे हैं।— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 8, 2021
पुढे त्यांनी कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा न करणे यासह संपूर्ण कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा केंद्र सरकारने बट्ट्याबोळ केला आहे, असा स्पष्ट शब्दात आरोपही केला आहे.