मुक्तपीठ टीम
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दहिसर ते अंधेरी या मेट्रो मार्गावर ओव्हरहेड वायरचे काम करण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. प्राधिकरणाने या मार्गाला वीजपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेट्रो २ ए कॉरिडोरच्या मार्गावर अत्याधुनिक उपकरणांसह वायर बसविण्याचे काम वेगाने केले जात आहे. तारा जोडण्यापूर्वी या मार्गावर त्यासाठीचे खांब आधीच बसवले गेले आहेत.
मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये या मार्गावर चाचणी सुरू करण्याची एमएमआरडीएची योजना आहे. योजनेनुसार ट्रायल रनसह इतर सर्व कामे वेळापत्रकात पूर्ण झाल्यास जून किंवा जुलैपासून मेट्रो सेवा सुरू होईल. अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) दरम्यान १६.४७३ किमी लांबीचे मेट्रो ७ आणि दहिसर ते डीएन नगर दरम्यान १८.५ किमी लांबीचे मेट्रो २ ए कॉरिडॉरचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गासह स्थानकांवर एस्केलेटरसह अन्य उपकरणे बसविली जात आहेत.
दरमहा १ किंवा २ मेट्रो रॅक मुंबईत येतील. मे महिन्यापर्यंत मेट्रोचे १० रॅक बंगळूरुहून मुंबईला येण्याची शक्यता आहे. मेट्रोची देखभाल व त्याची कार्यवाही करण्याची संपूर्ण जबाबदारी महामेट्रोवर असेल. त्यासाठी चारकोपमधील १६ हेक्टर क्षेत्रामध्ये हे कारशेड तयार करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ: