मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तरूणाच्या जीवावर औषधांचा ओव्हरडोस बाधला आहे. प्रयागराजमधील एका तरूणाने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वियाग्राचा अतिवापर केला आणि त्याच्या जीवावर तो बेतला. लग्न झाल्यानंतर ३ महिन्यांतच परिस्थिती अशी निर्माण झाली की, या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, जिथे त्याला या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दोनदा ऑपरेशन करावे लागले. आता तरुणाच्या तब्यतीत सुधारणा झालेली आहे.
ही घटना संगम शहर प्रयागराजची आहे. पुरुषांच्या लैंगिक क्षमतेशी संबंधित या औषधाच्या ओव्हरडोसमुळे लग्नाच्या काही महिन्यांतच एका २८ वर्षीय तरूणाचे आयुष्य आणखीनच बिघडले. मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या दुर्मिळ प्रकरणात शस्त्रक्रिया करून तरुणाला वाचवले आहे. तसेच, डॉक्टरांनी कोणत्याही औषधाच्या ओव्हरडोस घेण्याआधी सावधगिरी बाळगावी असेही बजावले.
या तरूणाची समस्या गंभीर झाल्यावर त्याने पत्नीच्या मदतीने डॉक्टरांशी संपर्क साधला. युरोलॉजी विभागाचे डॉ. दिलीप चौरसिया यांच्या नेतृत्वाखालील टीमने तासभर पहिले ऑपरेशन केले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांना बोलावण्यात आले आणि शनिवारी ऑपरेशन यशस्वी झाले. त्याच्यावर पेनाईल प्रोस्थेसिस शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो सामान्य जीवन जगू शकेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, तरुणाने मित्रांच्या सांगण्यावरून वियाग्राचे सेवन केले. पण, २५ ते ३० मिली ग्रॅमपेक्षा ६ ते ८ पट जास्त डोस घेऊन २०० मिली ग्रॅम डोस घेणे सुरु केले. यामुळे त्याला प्रियापिझम नावाची गंभीर समस्या झाली. प्रायव्हेट पार्ट इरेक्शन आणि प्रचंड वेदना सुरू झाल्या.