Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारी काँग्रेस, पर्यावरण व मानव रक्षणासाठी प्राणपणाने लढेलः नाना पटोले

June 8, 2022
in घडलं-बिघडलं, निसर्ग
0
2day training of environment dept of Maharashtra Congress Committee

मुक्तपीठ टीम

विकास साधताना पर्यावरणाचं भान ठेवले पाहिजे. असमतोल विकास हानिकारक ठरू शकतो. शेतकरी, कामगार आदींवर पर्यावरण बदलाचा परिणाम होत आहे. केंद्रातील भाजपा सरकार आपल्या काही उद्योगपती मित्रांना खुश करण्यासाठी पर्यावरण कायद्याला धाब्यावर बसवून जल-जंगल आणि पर्यावरणाची हानी करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारी काँग्रेस पर्यावरण व मानव रक्षणासाठी प्राणपणाने लढेल असे महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

2day training of environment dept of Maharashtra Congress Committee

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाने बदलते हवामान व तापमान वाढ यासंदर्भात दोन दिवसीय पर्यावरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री बाजीराव खाडे,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार अमर राजूरकर, सरचिटणीस डॉ. गजानन देसाई, दिपक परुळेकर आणि पर्यावरण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

2day training of environment dept of Maharashtra Congress Committee

यावेळी बोलताना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरत म्हणाले की, भावी पिढ्यांना चांगले भवितव्य द्यायचे असेल तर पर्यावरणाच्या रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्लोबल वार्मिंग, कार्बन उत्सर्जन हे संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठे संकट आहे. काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली राजकारणासोबतच पर्यावरण रक्षणाचे काम सुरु आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. राजकारण, आरोप- प्रत्यारोप चिखलफेकीच्या काळात हे अत्यंत सकारात्मक आणि चांगले काम काँग्रेस पक्ष करत आहे याचा समाजात चांगला संदेश जाईल.

2day training of environment dept of Maharashtra Congress Committee

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, फक्त राजकीय विषयांपुरती आपली बांधिलकी नाही तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण या उद्देशाने काँग्रेस पक्ष काम करत आहे. तापमानवाढीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. उष्माघाताने प्राणी आणि माणसांचे मृत्यू होत आहेत ही धोक्याची घंटा आहे. फक्त हवेचे प्रदूषणच नाही तर सध्या देशात वैचारिक प्रदूषण ही वाढत आहे ती सुद्धा धोक्याची घंटा आहे.

2day training of environment dept of Maharashtra Congress Committee

यावेळी बोलताना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, पर्यावरण हा मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कार्यकर्ते घडविण्यासाठी मते मिळवण्यासाठी राजकीय पक्ष शिबिरे घेतात पण पर्यावरण रक्षणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे त्याबद्दल मी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

2day training of environment dept of Maharashtra Congress Committee

महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागद्वारे हे नाविन्यपूर्ण शिबिर आयोजित केले आहे. शिबिरासाठी पर्यावरण विभागाचे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. सागर धारा आणि भारतीय पर्यावरण चळवळीचे ऍड. गिरीश राऊत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.


Tags: CongressEnvironmentnana patoleकाँग्रेसनाना पटोलेपर्यावरण
Previous Post

नुपुर शर्मांपासून धडा! भाजपाची प्रवक्ते-नेत्यांसाठी आचारसंहिता! एवढंच बोला, तेवढं टाळाच…

Next Post

तरुणाला लग्नानंतर वियाग्रा ओव्हरडोस बाधला, दोन शस्त्रक्रियांनंतर सुटका!

Next Post
Viagra Overdose

तरुणाला लग्नानंतर वियाग्रा ओव्हरडोस बाधला, दोन शस्त्रक्रियांनंतर सुटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!