Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

म्युकर मायकॉसिससाठी फक्त स्टेरॉइड-मधुमेहच नाही ‘पाणी’ही असू शकते कारण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mucer

मुक्तपीठ टीम

कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतरही ग्रासणाऱ्या म्युकरमायकॉसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा कहर वाढतच चालला आहे. काळ्या बुरशीसाठी आरोग्यमंत्र्यांपासून डॉक्टरांपर्यंत सर्व प्रामुख्याने स्टेरॉइड आणि मधुमेहाकडे बोट दाखवत आहेत. त्यात तथ्य आहेच, पण वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते सांगितली जाणारी कारणे खरी जरी असली तरी त्याच जोडीने काळ्या बुरशीचा प्रकोप आताच का वाढला त्यावर विचार केला जाणे आवश्यक आहे.

त्यासाठी व्हेंटिलेटरसाठी योग्य दर्जाचे अतिशुद्ध डिस्टिल्ड वॉटरऐवजी साधे पाणी वापरण्याचा निष्काळजीपणा आणि अन्य वैद्यकीय निष्काळजीपणाही कारणीभूत असू शकतो, असं मत डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केले आहे.

 

कोरोनाग्रस्तांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवेला मोलाचं सहकार्य करत असलेल्या वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांच्या मते रुग्णांवर कोरोना उपचार करत असताना सध्या स्टेरॉइडचा अतिवापर आणि मधुमेहासारख्या रोगांकडे बोट दाखवले जात आहे. ते खरेही आहे. पण हे रोग, स्टेरॉइडचा वैद्यकीय क्षेत्रातील वापर हे काही आजचे नाही. ते नेहमीचे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही ते होते. परंतु आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ते एप्रिल-मे महिन्यातच म्युकरमायकॉसिसची प्रकरणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली, त्यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे.

 

डॉ. घुले यांच्या मते म्युकरमायकॉसिसचा कहर वाढण्यासाठी पुढील कारणेही जबाबदार असू शकतात.

म्युकरमायकॉसिसच्या उद्रेकामागे ‘ही’ कारणंही असू शकतात…

  • कोरोना उपचार करतानाचा वैद्यकीय निष्काळजीपणा
  • व्हेंटीलेटरसाठी डिस्टिल्ड वॉटर न वापरता साधे पाणी वापरणे.
  • खरंतर रुग्णांचे दात स्वच्छ करण्यासाठीही साधे पाणी वापरु नये, डिस्टिल्ड वॉटरच वापरावे, असेही सांगितले जाते. पण तसे होत नाही.
  • साधे पाणी हे डोळ्यांनी स्वच्छ दिसत असले तरी अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते दुषित असू शकते.
  • बॉटल्ड वॉटरलाही वापरणे, योग्य नाही. काही लोकल ब्रँड्समध्येही शुद्धतेची खात्री देता येत नाही.
  • योग्य दर्जाच्या सिरिंज, वैद्यकीय साहित्य नसणे.
  • उपचार करणाऱ्यांमध्येच संसर्ग असण्याची शक्यता, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्याही नियमित तपासण्या आवश्यक आहेत.

याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रातील काहींनी एफडीएकडे बोट दाखवले. सध्या कोरोना उपचारासाठी वैद्यकीय साधने, साहित्य, औषधे याची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, ते बनवणाऱ्यांच्या उत्पादन प्रक्रियेत तेवढ्या काटेकोरपणे शुद्धता राखण्याची काळजी घेतली जाते का, ते तपासणे एफडीएचे काम आहे. ते केले जातेच असे नाही. किमान रँडम सॅंपलिंग करून तपासणी आवश्यक असते, तेही होत नाही. रुग्णालयांची तपासणीही केवळ दाखवण्यापुरतीच होते. त्यामुळे आधीच कोरोनाचा कुकाळ आणि त्यात म्युकरमायकोसिसचा तेरावा महिना असे होत असल्याची खंत वैद्यकीय व्यावसायिक व्यक्त करतात.

म्युकरमायकोसिसची काळी बुरशी कोठे हल्ला करते?

या आजारामध्ये काळी बुरशी नाक, सायनस, डोळा आणि मेंदूमध्ये पसरत त्यांचा नाश ग्रासते, असे दिसून आले आहे.

म्युकरमायकोसिसची लक्षणं

  • ताप, डोकेदुखी, खोकला किंवा श्वास लागणे.
  • नाक बंद. नाक मध्ये श्लेष्मासह रक्तस्त्राव आहे.
  • डोळा दुखणे. डोळा फुगला पाहिजे, एक गोष्ट दृश्यमान आहे किंवा दिसणे थांबवते.
  • चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, सूज किंवा नाण्यासारखा त्रास आहे.
  • दातदुखी, दात हलणे सुरू होते, चघळताना दातदुखी.
  • उलट्या किंवा खोकला असताना श्लेष्मामध्ये रक्त.

 

लक्षण आढळली तर काय करायचं?

  • जर आपल्याला म्युकरमायकोसिसची कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब शासकीय रुग्णालय किंवा इतर कोणतेही विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • लवकरात लवकर उपचार सुरु करा.

Tags: coronaDr. Rahul Ghulemucormycosisventilatorकोरोनाडॉ. राहुल घुलेम्युकरमायकॉसिसव्हेंटिलेटर
Previous Post

स्टेट बँकेतील क्लार्कच्या ५ हजार जागांसाठीचा आज शेवटचा दिवस

Next Post

मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा सहभागी होणार

Next Post
chandrakant patil

मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा सहभागी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!