Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मानधन तत्वावर काम करण्यासाठी भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

October 9, 2021
in करिअर, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Mantralaya

मुक्तपीठ टीम

प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची तयारी करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

इच्छुक अनुवादकांनी आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ या पत्त्यावर १० नाव्हेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत. असे भाषा संचालक, यांनी कळविले आहे.

 

कोण अर्ज करु शकेल?

  • अनुवादकास प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी पर्यावरण, संगणक तंत्रज्ञान यापैकी एक किंवा त्याहून अधिक विषयांचा अनुवाद करण्याचा अनुभव असावा.
  • अनुवादकास मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • ज्या व्यक्तींनी उपरोक्त एक किंवा अनेक विषयांमध्ये स्वतः अनुवाद करून पुस्तके प्रकाशित केली आहेत अशा व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.
  • अनुवादकास पुरेसे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुवाकाकडे इंटरनेटसह संगणकाची सुविधा असावी.
  • मराठी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी/पदवी/अनुवाद पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.

 

कामाचे स्वरुप तसेच अटी व शर्ती

  • नामांकित तज्ज्ञ अनुवादकांना अनुवादांची कामे शासनाच्या विविध विभाग, मंडळे. महामंडळे यांच्याकडून परस्पर पाठविण्यात येतील तसेच संबंधित विभाग व कार्यालय आणि तज्ज्ञ अनुवादक यांच्यामध्ये ठरविण्यात येईल अशा कालावधीत ही कामे नामांकित अनुवादकांना विहित मुदतीत पूर्ण करून द्यावी लागतील.
  • नामांकित अनुवादकांना शासन वेळोवेळी निश्चित करील त्या मानधन दरानुसार मानधन अनुज्ञेय राहील.
  • अनुवादकाने अनुवादित केलेल्या अनुवादाच्या अचुकतेची जाबाबदारी सर्वस्वी संबंधित अनुवादकाची राहील.
  • अनुवादकांनी त्याच्या कामाचा सहामाही अहवाल विहित नमुन्यात या कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक राहील.
  • नामांकित तज्ज्ञांना त्यांची अचूकता कार्यक्षमता व कार्यतत्परता विचारात घेऊन वगळण्याचा तसेच नामिकेत नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचा अधिकार या कार्यालयाचा राहील.

Tags: Directorate of LanguagesMaharashtramantralayamarathisubhash desaiभाषा संचालनालयमंत्रालयमराठीमहाराष्ट्रसुभाष देसाई
Previous Post

“नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते”

Next Post

भारतीय अंतराळ आणि उपग्रह कंपन्यांच्या इंडियन स्पेस असोसिएशनची स्थापना

Next Post
ISPA

भारतीय अंतराळ आणि उपग्रह कंपन्यांच्या इंडियन स्पेस असोसिएशनची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!