मुक्तपीठ टीम
जे ग्राहक ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या राईडची आतूरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. ओलाच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड सुरू झाली आहे. तमिळनाडूत जगातील सर्वात मोठा प्लांट असणाऱ्या EV-निर्माता कंपनीने त्यांच्या S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर्स या वर्षी १५ ऑगस्ट रोजी लाँच केल्यानंतर प्रथमच टेस्ट राइड्स सुरू केल्या आहेत.
टेस्ट राइड कुठे होणार?
- ओला इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी राइडची संधी सध्या तरी मुंबईसह महाराष्ट्रात उपलब्ध नाही.
- सुरुवातीला टेस्ट राइड अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू या चार शहरांमध्ये उपलब्ध असेल.
- या शहरांमधील निवडक ठिकाणी स्कूटर उपस्थित असतील- दिल्लीमध्ये, ओला इलेक्ट्रिकने सायबर सिटी, गुरुग्राममधील फोरम (वीवर्क) येथे चाचणी राइड आयोजित केली आहे.
- कोलकात्यात चाचणी राइड घेऊ इच्छिणाऱ्यांना साउथ सिटी मॉलला भेट द्यावी लागेल.
- अहमदाबादमधील चाचणी राइडचे आयोजन हिमालय मॉलमध्ये करण्यात आले आहे.
- बंगळूरूसाठी चाचणी राइड स्थान प्रेस्टिज क्यूब लस्कर आहे.
ओलाने दिली माहिती
- ओला इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “१० नोव्हेंबर २०२१ पासून निवडक शहरांमध्ये चाचणी राइड्स सुरू झाली आहे आणि पुढील काही आठवड्यांत त्या संपूर्ण भारतात आणल्या जातील.
- तुमच्यासाठी जवळचा ओला टेस्ट राइड कॅम्प शोधा आणि तुमचा स्लॉट आत्ताच बुक करा.
- “ओला इलेक्ट्रिकच्या मते S1 किंवा S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी अंतिम पेमेंट विंडो बुधवारी उघडली आहे आणि ज्यांनी त्यांचे बुकिंग यापूर्वी केले आहे त्यांना याबाबत अलर्ट पाठवला जाईल.
Having some fun with the scooter!
Test rides begin in the coming week and first deliveries begin soon after 👍🏼 pic.twitter.com/9YVFHpLwZw
— Bhavish Aggarwal (@bhash) November 7, 2021
ही कागपत्रे महत्वाची
- जे चाचणी राइड घेण्यास इच्छुक आहेत त्यांच्यांकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- यामध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याचा ऑर्डर आयडी, वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि हेल्मेट यांचा समावेश आहे.
- ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना त्यांच्या स्लॉटपूर्वी संबंधित ठिकाणी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.
- डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याबद्दल ग्राहकांकडून टीका झाल्यानंतर, कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगसाठी नवीन तारीख वाढवली होती.
ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबरमध्ये दोन दिवसांसाठी S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू केले. कंपनीने दावा केला आहे की त्या विंडोमध्ये त्यांना १००,१०० कोटींहून अधिक बुकिंग मिळाले आहे. ओला S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत अनुक्रमे १ लाख आणि १.३० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटर्स एकूण १० रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. जे एका चार्जवर १८० किलोमीटरपर्यंतच्या रेंजचे आश्वासन देते.