मुक्तपीठ टीम
सातारच्या सैनिक स्कूलमध्ये पीईएम/ पीटीआय कम मेट्रन या पदासाठी १ जागा, नर्सिंग सिस्टर या पदासाठी १, राईडिंग इंस्ट्रक्टर या पदासाठी १ जागा अशा एकूण ३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत आहे. या रोजगार संधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पीईएम / पीटीआय कम मॅट्रॉन- मॅट्रिक किंवा समकक्ष
२) नर्सिंग सिस्टर- नर्सिंग डिप्लोमा / पदवी
३) राईडिंग इंस्ट्रक्टर- मॅट्रिक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज या पत्यावर पाठवावा
प्राचार्य, सैनिक स्कुल सातारा, सातारा- ४१५००१, महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी सैनिक स्कुल साताराच्या अधिकृत वेबसाइट http://www.sainiksatara.org/ वरून माहिती मिळवू शकता.