Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत फक्त ३४ मतदार

अनिल गलगली यांनी केली धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil galgali

मुक्तपीठ टीम

मुंबई मराठी ग्रंथालयाची साधारण सभेची निवडणूक नुकतीच झाली. त्या निवडणुकीचे वाद मिटललेले नाहीत. तोवर संग्रहालयाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूका निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत घटनेप्रमाणे सहा हजारापेक्षा अधिक मतदार असण्याऐवजी फक्त ३४ मतदार असल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी आक्षेप घेत थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

 

अनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्त सहित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक अधिकारी आणि भोईवाडा पोलिसांना पाठविलेल्या लेखी तक्रारीत स्पष्ट केले आहे की मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक संबंधात परिपत्रक दिनांक ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निघाले आहे. या परिपत्रकात अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणूकीत मतदानाचा अधिकार फक्त साधारण सभेवर निवडून आलेल्या ३४ सभासदांना आहे असे आक्षेपार्ह विधान आहे. या विधानाला कोणताही नियमांचा आधार नाही. संस्थेच्या घटना व नियमावलीत साधारण सभेचे सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडतील असे कुठल्याही नियमात नमूद केलेले नाही. उलट घटना व नियमावलीत कलम १०(१) मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून देण्याचा, उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आश्रयदाता, सहायक, उपकर्ता, आजीव, सन्माननीय सभासद या वर्गातील सभासदांना आहे असे स्पष्ट म्हटले आहे.

 

त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्याचा अधिकार केवळ साधारण सभेच्या ३४ सभासदांना आहे ही बाब अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी चुकीची आहे. वस्तुतः ही निवडणूक खुली होऊन संग्रहालयाच्या सर्व शाखांमध्ये असलेल्या सभासदांना मतदानासाठी अधिकार मिळाला पाहिजे. तोपर्यंत ही नियमबाह्य निवडणूक रद्द करणे संयुक्तिक ठरेल, असे गलगली यांचे मत आहे.

 

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे आहेत. दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे , निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार आहेत. डॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार २०१७ पासून वादग्रस्तरित्या झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता.

 

या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच कोणत्या या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणूकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फक्त ३४ सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, अशी चर्चा आहे.


Tags: Anil GalgalielectionsMarathi Granth Sangrahalayamuktpeethmumbaiअनिल गलगली यांनी केलीतक्रारधर्मादाय आयुक्तांकमुक्तपीठमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय
Previous Post

“एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा फ्लेचर पटेलशी संबंध काय? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेलच पंच कसे?”

Next Post

विरोधी पक्षेनेते झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २३१ पत्र!

Next Post
fadanvis-thackeray

विरोधी पक्षेनेते झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २३१ पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!