Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लसींचं मोठं संरक्षण! लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या दहा हजारांपैकी फक्त २ ते ४ बाधित!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

देशभरात कोरोना पासून बचावासाठी सुरक्षा कवच म्हणून लसींकडेच पाहिले जात आहे. देशात आज कोट्यवधींचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्या लोकांनी लस घेतली त्यापैकी १० हजारांमागे फक्त २ ते ४ लोकांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण खूपच अत्यल्प असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे.

आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी लसींचे महत्त्व ठासून सांगितले. ते म्हणाले की ज्यांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यातील संसंर्गाविषयीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की अगदी अत्यल्प लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आयसीएमआरची आकडेवारी काय सांगते?

  • कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसनंतर आतापर्यंत ०.०४ टक्के लोकांना कोरोनाची बाधा
  • कोव्हिशिल्डच्या दुसर्‍या डोसनंतर ०.०३ टक्के लोकांना कोरोनाची बाधा
  • कोव्हिशिल्ड लसीचे ११ कोटी ६ लाख डोस देण्यात आले आहेत. १० कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, त्यापैकी १७१४५, म्हणजे १० हजारामागे २ लोकांना लोकांना संसर्ग झाला.
  • १ कोटी ५७ लाख ३२ हजार ७५४ लोकांनी या लसीचा दुसरा डोस घेतला व त्यापैकी फक्त ५ हजार १४ (०.०३ टक्के) लोक कोरोनाबाधित झाले. अशा प्रकारे १० हजारांमागे २ ते ४ लोकांमध्ये ‘ब्रेकथ्रू इन्फेक्शन’ घडून आले आहे.

भार्गव यांच्यामते हे प्रमाण अत्यल्प आहे. यापैकी बहुतांश लोक प्रामुख्याने व्यवयासाच्या स्वरूपामुळे जास्त धोका असलेले आरोग्य कर्मचारी होते, असे भार्गव यांनी सांगितले.

लसीकरणानंतरही घ्या काळजी!

  • लसीकरणानंतरही लोकांनी मास्क वापरावे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी देत असतात.
  • आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये लसीकरणानंतर कोरोना विषाणूचे आणि मृत्यूचे प्रमाण हे कमी आहे, लसीकरण हे खूप महत्वाचे आहे.

Tags: covishield vaccinevaccinationआयसीएमआरकोरोनाबलराम भार्गव
Previous Post

१ मेपासून तरुणांचे लसीकरण अवघड! सीरमच्या लसी २४ मेपर्यंत केंद्रासाठीच बुक!!

Next Post

#अध्यात्म भाव तेथे देव

Next Post
sumedha

#अध्यात्म भाव तेथे देव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!