Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटात दिव्यांगांना ऑनलाइन मानसिक आधार

May 10, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
CRC

मुक्तपीठ टीम

 

दिव्यांगांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात भीतीमुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन तथा प्रशिक्षण देण्यासाठी नागपूरमध्ये खास ऑनलाइन सेवा सुरु झाली आहे. समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास, पुनर्वसन तथा दिव्यांग सक्षमिकरण केंद्र अर्थात सी.आर.सी. द्वारे समुपदेशन, मार्गदर्शन सेवा ऑन-लाईन पद्धतीने निशु:ल्क पुरवली जात आहेत.

 

दिव्यांग समुपदेशन ऑन-लाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी, वैद्यकीय पुनर्वसन सेवांसाठी डॉ. विठल पुरी (8249709973), विशेष शिक्षणासंबंधित सेवांसाठी जगन मुडघडे (7588875899) व कविता घोडमारे (8208279744), मानसशास्त्रीय समुपदेशन तथा मार्गदर्शन सेवांसाठी अपर्णा भालेराव (8888125826), व्यावसायिक थेरपीसाठी डॉ. अश्विनी दहाट (8888859929), ऑर्थोसिस आणि प्रोथोसिससाठी डॉ.माधुरी कांबळे (8806320693), दृष्टीबाधित गतिशीलता प्रशिक्षण सेवांसाठी अस्लम खान (9027650265), दिव्यांग व्यक्तींच्या विविध योजना आणि सवलतीसाठी राजेंद्र मेश्राम (9421701280) यांचेशी कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता सकाळी 9 ते संध्याकाळी 5;30 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन सी.आर.सी. केंद्राचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी केले आहे.

 

या सर्व ऑन-लाईन पुनर्वासनात्मक सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणताही शुल्क लागत नाही. सी.आर.सी., नागपूर येथिल पुनर्वसन तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना या सर्व सेवा ऑन-लाईन उपलब्ध आहेत. यासाठी दिव्यांग बालकांच्या पालकांचा वॉट्सअॅप ग्रुप तयार करून थेट फोनद्वारे, व्हिडिओ चॅट, लेखी सूचना आणि ऑनलाईन वेबिनर किंवा प्रशिक्षण कार्यक्रम, ऑनलाइन चर्चा सत्रे याद्वारे समुपदेशन व मार्गदर्शन करत आहेत तसेच केंद्राच्या वेबसाइट आणि फेसबुक पेजवर कोरोना शी संबंधित उपयुक्त असलेली महत्वाची माहिती आणि विविध विषयांवरील लेख पोस्ट केले जात आहेत.

 

दिव्यांग बालके तथा त्यांचे पालक यांच्या मानसिक आजार होण्याच्या वाढत्या घटनेकडे, विशेषत: कोरोना आजाराची भीती लक्षात घेता, त्यांच्या मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना दिलासा व मदत मिळावी म्हणून नागपूर आणि आमरावती क्षेत्रासाठी टोल फ्री क्रमांक 1800-599-0019 या “किरण” नावाच्या मानसिक आरोग्य हेल्पलाईनची 24 तास अविरत कार्यरत असणा-या सेवेची सुरूवात केली गेली आहे. या फ्री हेल्पलाइनद्वारा मानसिक रुग्ण व्यक्तींचा शोध, प्रथमोपचार, मानसिक समर्थन, ताण व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य, सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन, मानसिक संकट व्यवस्थापन इत्यादी सेवा प्रदान करण्यात येतात. या फ्री हेल्पलाइनचा मुख्य हेतू तणाव, चिंता, नैराश्य, घाबरलेल्या लोकांना सेवा, ताण, समायोजन विकार, अत्यंत क्लेषकारक तणाव विकार, आत्महत्येचा विचार, साथीच्या आजाराने प्रेरित मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे हा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronanagpurऑनलाइनकोरोना संकटदिव्यांगमुक्तपीठ
Previous Post

पुण्यातील पुण्याचं काम, सन्मानानं शेवटच्या निरोपासाठी उपक्रम

Next Post

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
good news morning bulletin

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!