Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील पुण्याचं काम, सन्मानानं शेवटच्या निरोपासाठी उपक्रम

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
ससून रुग्णालया

प्रणव ढमाले

राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती जास्तच गंभीर आहे. मृतांचा आकडाही नेहमीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत आरोग्यव्यस्थेवर ताण येत आहे. पुणे मनपाच्या यंत्रणेवरील कामाच्या ओझ्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्रास होऊ लागला होता. ही समस्या ओळखून गेली अनेक दशके पुण्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, सेवा सहयोग आणि ‘स्व’-रूपवर्धिनी या संस्था मृत नातेवाईंकांना मयत पास देणे व अंत्यसंस्काराच्या कामात मोठी मदत करीत आहे.

ससून रुग्णालया

 

पुण्यात कोरोना रुग्ण अंत्यविधी कामातील पहिला टप्पा ससून रुग्णालयातून सुरू होतो. शेवटचा टप्पा वैकुंठ स्मशानभूमीत पूर्ण होतो. यासाठी दोन्ही ठिकाणी सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, सेवा सहयोग आणि ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थांचे दत्तात्रय खडके, हर्षद सोनवणे, विवेक शेलार, परशुराम हाके, रविराज शेलार, ओमकार खडके, विकास पोळ तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. त्यांनी पाच दिवसात साधारणत: ९५० मयत पास काढून दिले आहेत. तर वैकुंठ स्मशानभूमीत स्वयंसेवकांनी २५६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

 

ससून रुग्णालया

या संस्थांमुळे पुणे शहरातील ससून रुग्णालयातील ‘मयत पास’ तब्बल २८ वर्षांनंतर ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा शारिरीक व मानसिक त्रास कमी झाला आहे. अंत्यसंस्काराची प्रक्रिया अधिक सुरळीत सुरू रहावी, नातेवाईक व मित्रपरिवार यांना वेळेत सर्व विधी पूर्ण करता यावे यासाठी २४ तास प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सुराज्य सर्वांगीणचे विजय शिवले यांनी दिली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर स्मशानात अनेक तास वाट पाहावी लागणे, काही मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीच नसल्याने अडचण होणे या समस्या दूर झाल्या आहेत, असे ‘स्व’रुपवर्धिनीचे निलेश धायरकर यांनी सांगितले. थोडक्यात कोरोना मृतांनाही आता सन्मानानं अखेरचा निरोप दिला जात आहे. पुण्यात पुण्याचं काम घडतंय ते असं.

ससून रुग्णालया

 

गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यासोबतच कोरोना मृत्यूंचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ससून हॉस्पिटलमध्ये आणि वैकुंठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या महापालिका कर्मचारी यासाठी रात्रंदिवस झटत आहे. परंतु कामाचा व्याप मोठा आहे. यासाठी याकामात युवकांची गरज होती. त्यासाठी सुराज्य सर्वांगीण विकास, ‘स्व’-रूपवर्धिनी आणि सेवा सहयोग या संस्थांच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदतीला स्वयंसेवकांचा संघ उपलब्ध करून दिला आहे. हे स्वयंसेवक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आधारकार्डसह माहिती देणाऱ्यांचे आधारकार्ड, शवागृहातील डॉक्टरांचे घोषणापत्र, नमुना क्रमांक दोन (सांख्यिकी) हे चार कागदपत्रे घेऊन पाच प्रतिमध्ये ‘मयत पास’ अवघ्या काही मिनिटात ऑनलाइन देतात. या मयत पासमुळे नातेवाईकांना पार्थिवाचे दहन करणे व मृत्यू दाखला मिळविणे यासाठी उपयोगी पडतो.

 

ससून रुग्णालया

ऑनलाइनमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी

ऑनलाइनमुळे मयत पासमुळे सामाजिक अंतर राखता येते. यासह कागदपत्रांची हाताळणी करण्याची आवश्‍यकता नाही. व्हॉटसॲप वेबमुळे झेरॉक्स घेण्यासाठी फिरण्याची गरज नाही. मोबाईलवर गावकडील कागदपत्रे सुद्धा सहज मागविता येतात. या सुविधेमुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा त्रास कमी होऊन कोरोनाचा संसर्गाची शक्यता कमी असल्याचेही सुराज्य सर्वांगीण संस्थेचे विजय शिवले यांनी सांगितले.

 

ससून रुग्णालया

ससून मयत पास केंद्र व वैकुंठ स्मशानभूमीत प्रत्यक्ष काम करण्यासाठी, भेटीसाठी व अन्य साहाय्य व मदतीसाठी नक्की संपर्क करावा.
निलेश धायरकर – 9029074521
नितीन भांगरे – 9579587510
मल्लेश मोरे – 9545235757

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: puneपुणे शहरप्रणव ढमालेवैकुंठ स्मशानभूमीससून रुग्णालयसुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पस्व-रूपवर्धिनी
Previous Post

महाराष्ट्राचा दिल्लीला मदतीचा हात…रेल्वेनं पाठवलं दूध

Next Post

कोरोना संकटात दिव्यांगांना ऑनलाइन मानसिक आधार

Next Post
CRC

कोरोना संकटात दिव्यांगांना ऑनलाइन मानसिक आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!