मुक्तपीठ टीम
भिमजयंती निम्मित एक खिडकी योजना सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्यांनी नियोजन भवन येथील बैठकीत दिले होते.मात्र अकोला महानगरपालिका मध्ये एक खिडकी योजना सुरू नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले त्यामुळे वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, माजी गटनेता गजानन गवई आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे ह्यांनी तातडीने महापालिका गाठली.मनपा उपायुक्त पूनम कळंबे आणि मनपा उपायुक्त डॉ जावळे ह्यांचे सोबत चर्चा करून वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी पुढाकार घेत मनपातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘एक खिडकी’ जागा निश्चित केली.
मनपा चे कर्मचारी पोलीस कर्मचारी व अग्निशमन वीज मंडळ कर्मचारी ह्यांनी हजर करून सदर ‘एक खिडकी’ योजना वंचित च्या पदाधिकारी ह्यांनीच सुरू करून टाकली.”जयंती साजरी करण्यासाठी आडकाठी आणू नका, सर्व परवानगी अर्ज महानगरपालिका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्विकारा” अशी तंबी देखील वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी दिली.शिवणी खदान येथून आलेल्या मंडळाचे पदाधिकारी ह्यांना थेट परवानगी मनपा अधिकारी टापरे ह्यांचे हस्ते देण्यात आले.