मुक्तपीठ टीम
जर तुम्ही येत्या काही दिवसात मध्य रेल्वेने कुठे जाण्याचा प्लान करत असाल, तर त्याआधी ही बातमी वाचणे महत्त्वाचे आहे. मध्य रेल्वेचा एक आठवडा ट्रॅफिक ब्लॉकचा आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभाग इगतपुरी येथील टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी २३ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत विशेष ट्रॅफिक ब्लॉक चालवणार आहे. दरम्यान या ट्रॅफिक ब्लॉकमुळे या मार्गावरील काही रेल्वे रद्द, तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
रेल्वे सेवा रद्द-
02102/02101 मनमाड-मुंबई-मनमाड उन्हाळी विशेष रेल्वे २८ मे ते ०२ जून २०२२ (6 दिवस) पर्यंत रद्द असेल.
- २८ मे रोजी डाऊन गाड्यांचे नियम
- 11059 लोकमान्य टिळक टर्मिनर्स – छपरा एक्सप्रेस
- 11061 लोकमान्य टिळक टर्मिनर्स – जयनगर एक्सप्रेस
२८ मे २०२२ रोजी येणार्या अप गाड्यांचे नियम
- 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
- 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
- 15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस
- 12520 – कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
- 15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
- 12335 भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
JCO ट्रेनचे २८ मे २०२२ चे पुनर्निर्धारित वेळापत्रक
12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस JCO २८ मे २०२२ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २९ मे २०२२ रोजी ४.३० वाजता सुटेल.
15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस २८ मे २०२२ रोजी त्याच दिवशी ६.३० वाजता पनवेलहून सुटेल.
३१ मे २०२२ रोजी टिटोली यार्ड येथे ५.१५ ते ११.१५ पर्यंत विशेष ब्लॉक
ट्रेन सेवा रद्द
- 12071 मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस (३१-५-२२)
- 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (३१-५-२२)
३१-५-२२ रोजी गाड्यांचे पुनर्निर्धारित वेळापत्रक
- लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.५५ वाजता सुटणारी 11059 छपरा एक्सप्रेस १२.१५ वाजता सुटेल.
- सीएसएमटीहून ११.०५ वाजता सुटणारी 82356 मुंबई पटना एक्स्प्रेस १.०० वाजता सुटेल
- पनवेलहून सुटणारी 11061 गोरखपूर एक्सप्रेस ३.५० वाजता ८.३० वाजता सुटेल.