Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दर मिनिटाला एक बलात्कार! बेटी नाहीच भारतात सुरक्षित!!

January 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
rape

मुक्तपीठ टीम

 

देशभरात महिलांवरील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात असे उघड झाले आहे की, भारतात असे कोणतेही राज्य नाही जेथे महिला व मुली सुरक्षित आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये महिलांवरील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दररोज भारतात सरासरी ८८ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

 

 

एनसीआरबीच्या ‘क्राइम इन इंडिया’ २०१९ च्या अहवालात देशभर महिलांवरील सामान्य गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये महिलांविरूद्धच्या गुन्ह्यांमध्ये एकूण ४,०५,८६१ घटना नोंदविण्यात आल्या असून त्यात २०१८ च्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतात महिला गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत.

 

या भीषण आकडेवारीनुसार दर १६ मिनिटाला भारतात कुठेतरी बलात्कार होतो तर दर चार मिनिटाला महिला तिच्या घरच्यांकडून कौटुंबिक अत्याचाराला सामोरे जाते. वर्षभरात झालेल्या बलात्काराच्या एकूण ३२,०३३ घटनांपैकी ११% मुली या दलित समाजातील आहेत.

 

“आयपीसीअंतर्गत महिलांविरूद्ध गुन्हेगारीत बरीच प्रकरणे नोंदवली गेली यात ‘पती किंवा त्याच्या नातेवाईकांद्वारे क्रूरता’ (३०.९%), ‘विनयभंगाच्या हेतूने महिलांवर हल्ला’ (२१.८%), ‘महिलांचे अपहरण’ या अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. २०१९ मध्ये ६२.४  आणि २०१८ मध्ये ५८.८ प्रत्येक लाख लोकसंख्येमागे गुन्हेगारीचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे.

 

त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही महिलांवरील अत्याचाराची सर्वाधिक नोंद झाली आहे. २०१९ मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या ५,९९७ घटना नोंदविण्यात आल्या असून त्यामध्ये १३१३ अल्पवयीन मुली आहेत आणि उत्तर प्रदेशात ३,०६५ घटना घडल्या आहेत. त्याच बरोबर राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार सन २०२० मध्ये ऑगस्टपर्यंत ३,४९८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राजस्थानमध्येदेखील महिला सुरक्षित नाहीत हे या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

 

महिलांच्या गुन्ह्याबाबत त्वरित गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जात असल्याचे डीजीपी भूपेंद्र सिंह यांचे म्हणणे आहे. महिला गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक कायदेही बनविण्यात आले. असे अनेक भयंकर गुन्हे घडले आहेत, ज्यात दोषी अजूनही तुरूंगात आहेत. पण त्यांना फाशी देण्यात आलेली नाही.

 

निर्भया, हाथरस, हैदराबादसह अशा अनेक घटना घडल्या ज्याने संपूर्ण देश हादरवून टाकला. परंतु अशी काही प्रकरणे आढळून आली आहेत की ज्यावर कडक कारवाई केली गेली आणि गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. भारतात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून जेव्हा असे गुन्हे घडतील तेव्हा अशा प्रकरणात दोषींना अवघ्या काही दिवसांतच फाशी देऊन मृत्युदंड ठोठावण्यात येईल.


Tags: IPCKidnappingRajasthanraped caseUttar Pradeshअपहरणआयपीसीउत्तर प्रदेशबलात्कारमहिलांवरील गुन्हेगारीराजस्थान
Previous Post

व्यायाम करता…पण जर बसून काम…तर रक्तातील साखरेचा धोका! कसा टाळायचा?

Next Post

#शेतकरीआंदोलन प्रजासत्ताक दिनी तिरंग्यासह २ लाख ट्रॅक्टर्सची परेड!

Next Post
Farmer Tractors parade -6

#शेतकरीआंदोलन प्रजासत्ताक दिनी तिरंग्यासह २ लाख ट्रॅक्टर्सची परेड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!