Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“‘वन नेशन वन रेशनकार्ड’योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा”

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांचे आवाहन

April 17, 2021
in सरकारी बातम्या
0
maharashtra

मुक्तपीठ टीम

 

राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेवू शकतो. या योजनेंतर्गत १५ एप्रिल २०२१ पर्यंत मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात इतर राज्यातील १४७४ शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेतले असून लाभार्थ्यांनी “वन नेशन वन रेशन कार्ड” योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी केले.

 

“वन नेशन वन रेशन कार्ड” या योजनेची सुरुवात २०१८ मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करुन लाभार्थ्याना पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

 

या योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होणेच्या दृष्टीने १२ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. तसेच या योजनेची जनजागृती होऊन लाभार्थ्यांना योजनेमध्ये लाभ मिळावा या करिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करुन सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे कशाप्रकारे धान्यवाटप करण्यात येते. या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचे काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यामार्फत करण्यात येते.

 

“वन नेशन वन रेशन कार्ड” या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन क्र.14445 कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ई-मेल क्रमांक:-helpline.mhpds@gov.in कार्यान्वित आहे.

 

मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणा-या सर्व पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता शारिरीक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करुन योजनानिहाय अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे.

 

 


Tags: mumbaiOne Nation One Ration Cardpuneठाणेमुंबईवन नेशन वन रेशन कार्डशिधापत्रिका
Previous Post

“महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेने ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी”

Next Post

जागली सेवाभावाची भक्ती…मुंबईत देवालय झाले रुग्णालय!

Next Post
pawandham

जागली सेवाभावाची भक्ती...मुंबईत देवालय झाले रुग्णालय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!