Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक देश, एक खत : सर्व अनुदानित खते ऑक्टोबरपासून ‘भारत’ या नावाने विकली जाणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Bharat Fertilizer

मुक्तपीठ टीम

ऑक्टोबरपासून केंद्र सरकार ‘भारत’ या ब्रँड नावाखालीच युरिया आणि डीएपीसारखी सर्व अनुदानित खते विकणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध व्हावीत आणि मालवाहतूक अनुदानाचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकार हे करणार आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी पंतप्रधान भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प (PMBJP) अंतर्गत ‘वन नेशन वन फर्टिलायझर’ उपक्रमाचा शुभारंभ करताना ही घोषणा केली. ते म्हणाले की, ऑक्टोबरपासून सर्व अनुदानित खते ‘भारत’ या ब्रँडखाली विकली जातील. सध्या कंपन्या ही खते वेगवेगळ्या नावाने विकतात, मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवल्याने वाहतुकीचा खर्च तर वाढतोच शिवाय शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होतो. या समस्येवर मात करण्यासाठी आता अनुदानित खते एकाच ब्रँडखाली बनवली जाणार आहेत.

  • खत कंपन्यांना एक तृतीयांश पिशवीवर त्यांचे नाव, ब्रँड, लोगो आणि इतर आवश्यक माहिती टाकता येणार आहे.
  • खताच्या दोन तृतीयांश गोणीवर भारत ब्रँड आणि पीएमबीजेपीचा लोगो असेल.
  • ऑक्टोबरपासून ही व्यवस्था सुरू होणार असली, तरी खत कंपन्यांना त्यांचा सध्याचा साठा विकण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सरकारचे खत अनुदान किती?

  • सरकारने गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) १.६२ लाख कोटी रुपयांचे खत अनुदान दिले होते.
  • गेल्या पाच महिन्यांत खतांच्या जागतिक किमतीत वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारवरील खत अनुदानाचा बोजा २.२५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
  • भारत ब्रँड अंतर्गत सर्व अनुदानित खतांच्या विक्रीमागील कारण स्पष्ट करताना मांडविया यांनी स्पष्ट केले की, “सरकार युरियाच्या किरकोळ किमतीच्या ८० टक्के अनुदान देते, तसेच डीएपीच्या किमतीच्या ६५ टक्के, एनपीकेच्या किमतीच्या ५५ टक्के आणि पोटॅशच्या किमतीच्या ३१ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते.
  • याशिवाय खतांच्या वाहतुकीवरही वर्षाला ६,००० ते ९,००० कोटी रुपये खर्च होतात.

पाहा:


Tags: bharatDAPOne Nation One FertilizerSubsidized FertilizerUREAअनुदानित खतेएक खतएक देशडीएपीभारतयुरिया
Previous Post

गणपतीबाप्पाचा एक घरगुती पर्यावरणपूरक आनंदोत्सव! लाल मातीची मूर्ती, घरातच विसर्जन, सारं झाडांना अर्पण!

Next Post

ITR-U : आयकर भरणं राहून गेलं? अजूनही आहे संधी! वाचा बातमी…

Next Post
ITR

ITR-U : आयकर भरणं राहून गेलं? अजूनही आहे संधी! वाचा बातमी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!