मुक्तपीठ टीम
धुळे जिल्हा परिषदेच्या दत्तवाडी प्राथमिक शाळेच्यावतीने एक मुलगा एक झाड हा उपक्रम पंचक्रोशीतच नाही तर जिल्ह्यातही कौतुकाचा विषय ठरला आहे. या तसेच तो गावातील सामाजिक वनीकरण क्षेत्र वाढवण्यासाठी फायद्याचा ठरला आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या नावाने घरासमोर किंवा आपल्या शेतात लागवड केलेल्या वृक्षाची पूर्णपणे संगोपन करून वाढ करून दाखवली आहे. त्यामुळे दत्तवाडी गावचा परिसर हिरवाईनं नटू लागलाय.
गावाला हिरवेगार करणाऱ्या या उपक्रमाचे श्रेय जाते ते बापू सुकदेव बाविस्कर यांना. ते जिल्हा परिषदेच्या दत्तवाडीतील शाळेत २०१२पासून कार्यरत आहेत.
त्यांनी आपल्या शाळेत आरोग्य,शिक्षण स्वच्छता, व्यसनमुक्ती, स्त्री जन्माचे स्वागत, गावासाठी वाचनालय, तसेच पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम राबवले आहते. तसेच कोरोना निर्बंधांच्या काळात नेबर कट्टा सारखा उपक्रम राबवून मुलांचे शिक्षण निरंतर सुरू ठेवले आहे. मुक्तपीठच्या वतीने बाविस्कर सरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
बाविस्कर सरांच्या या उपक्रमांमुळे गावात कायम एक उत्साही वातावरण पाहावयास मिळते. आज दत्तवाडी गावातील गावकरी घरात कमी आणि वृक्षाखाली जास्त प्रमाणात गप्पागोष्टी करत असताना आपल्या पाहावयास मिळतात. त्यामुळे या उपक्रमाचा प्रतिसाद वाढता आहे. गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करून वृक्ष संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जणू गावाने हिरवाईची शालच परिधान केली आहे, असे आपणास वाटते.
गावातील समिती
- श्री कृष्ण हरी लांडगे – अध्यक्ष
- श्री शांताराम वनाजी भोरकडे – उपाध्यक्ष
- श्री समाधान बाबुराव लांडगे – सदस्य
- श्री ईश्वर बनाजी भोरकडे – सदस्य
- श्री प्रभू हरी लांडगे – सदस्य
- श्री अनिल सुदाम लांडगे – सदस्य
- श्री पंडित बाबुराव वाघ – सदस्य
- श्री भालचंद्र त्र्यंबक लांडगे – सदस्य
- श्री बाविस्कर बी एस – सचिव.
“एक मुलगा-एक झाड” उपक्रमाचे उद्देश
- पर्यावरणा विषयी जनजागृती घडवून आणणे.
- वृक्षाबद्दल प्रेम निर्माण करणे.
- मुलांप्रमाणे वृक्षांवरसुध्दा प्रेम वाढविणे.
- पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन देणे.
- गावात ‘हिरवळ बाग’ तयार करणे.
- एक मुल व एक झाड ही संकल्पणावाढीस लावणे.
- वृक्षांबददल जिव्हाळा निर्माण करणे,
- शासनाची योजना शाळेमार्फत गावातील लोकांपर्यत पोहचविणे.
- वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करून सर्व सार्वजनिक क्षेत्रात वाढ करून आणणे.
पाहा व्हिडीओ: