Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी चैत्यभूमी व दीक्षाभूमीसह राज्यात महामानवाला वह्या पेनाची मानवंदना

November 25, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
GNM 1

मुक्तपीठ टीम

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा संदेश दिला होता. त्यांच्या या संदेशाची अंमलबजावणी करताना गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ६ डिसेंबर या त्यांच्या महापरीनिर्वाणदिनी दादर चैत्यभूमी सह राज्यात सर्वत्र शैक्षणिक वस्तूंनी अभिवादन करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सर्वोच्च शिक्षण घेतले जगातील सर्वात बुध्दिवान व्यक्ती म्हणून कोलंबिया विद्यापीठाबाहेर त्यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. भारताचे संविधान लिहीण्यासह अर्थतज्ञ,कामगार नेता महिलांचे अधिकार अशा विविध शेकडो विषयांवर त्यांनी पुस्तके लिहीली.हे केवळ शिक्षणामुळेच शक्य झाले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा मोलाचा शैक्षणिक संदेश त्यांनी समाजाला दिला होता. त्यामुळे येत्या ६ डिसेंबर या त्यांच्या महापरीनिर्वाणदिनी दादर चैत्यभूमी व नागपूर दीक्षाभूमीसह राज्यात सर्वत्र त्यांना वह्या पेन पेन्सिल स्कूल बॅग,पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांनी त्यांचे अभिवादन केले जाणार असल्याची माहिती महामानव प्रतिष्ठान तसेच एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष पत्रकार राजू झनके यांनी दिली आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्त्मा ज्योतीबा फुले,सावित्रीमाई फुले , जिजाऊ ,यांच्यासह महापुरुषांचे जयंतीउत्सव,गणेशोत्सव व नवरात्रोत्सव महापरिनिर्वाण दिन दिन , धम्म चक्र प्रवर्तन दिन, संविधान दिवस स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या सणांसह, वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे व आवश्यक वस्तूंचे वितरण करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानाच्या वतीने मागील सात वर्षांपासून करण्यात येते या आवाहनाला समाजातुन वाढता प्रतिसाद मिळत आहे . महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभिनयाच्या वतीने मागील सात वर्षात हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आजही गावकुसाबाहेरील दुर्गम भागातील वर्ग शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून वंचित आहे.सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी हा वर्ग अज्ञानतेमुळे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहिलेला आहे. सशक्त भारत निर्माणासाठी भारत साक्षर होणे ही काळाची गरज असून या वर्गाला शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व सामाजिक,राजकीय धार्मिक संस्था संघटनांनी देखील डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक वस्तूंचे अभिवादन हा उपक्रम ठिक ठिकाणी राबवावा.जमा झालेल्या साहित्याचे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वितरण करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे. सदर उपक्रमात आपला सहभाग देण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान एक वही एक पेन अभियानांतर्गत ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात समाजातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राजू झनके यांनी दिली आहे.


Tags: good newsGood news Morningmahaparinirvan dinएक वही एक पेन अभियानपत्रकार राजू झनकेभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरमहापरीनिर्वाणदिनमहामानव प्रतिष्ठान
Previous Post

हिरा असली की नकली, कसा ओळखायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स…

Next Post

आता विमानातही पाहाता येणार तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सीरीज…

Next Post
AIRFLIX

आता विमानातही पाहाता येणार तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सीरीज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!