Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरातील राष्ट्रीय स्मारकांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत नि:शुल्क प्रवेश!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Taj Mahal

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पर्यटकांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एक चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय असा घेण्यात आला आहे की, ऑगस्ट महिन्यात ताजमहालसह सर्व संरक्षित राष्ट्रीय स्मारकांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. ५ ते १५ ऑगस्ट या तारखा यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत परंतु शुक्रवारी ताजमहाल बंद असतो त्यामुळे ६ ते १५ पर्यंत नि:शुल्क प्रवेश मिळेल.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक एनके पाठक यांनी हा आदेश जारी केला आहे. ताजमहाल, फतेहपूर सिक्री, आग्रा किल्ला आणि देशातील सर्व स्मारकांचे तिकीट काउंटर १५ ऑगस्टपर्यंत बंद राहतील. ताजमहालसह सर्व संरक्षित स्मारकांमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश मिळेल.

संपूर्ण देशात ताजमहालसाठी प्रवेश शुल्क हा सर्वाधिक आकारला जातो…

  • ताजमहालचे प्रवेश शुल्क हे देशातील सर्वात जास्त शुल्क आहे.
  • येथे भारतीय पर्यटकांकडून मुख्य समाधीसाठी ५० रुपये आणि २०० रुपये प्रवेश शुल्क आहे, तर विदेशी पर्यटकांसाठी मुख्य समाधीसाठी १ हजार १०० रुपये आणि २०० रुपये प्रवेश शुल्क आहे.

विशेष प्रसंगी पर्यटकांसाठी ताजमहालमध्ये नि:शुल्क प्रवेश!

  • ताजमहालमध्ये वीकेंड असो किंवा इतर काही प्रसंग भारतीय या ठिकाणी हजेरी लावतातच, त्यात विदेशी पर्यटकही येतात.
  • १५ ऑगस्टपर्यंत ते मोफत करण्याच्या आदेशामुळे शनिवार आणि रविवारच्या दिवशी पर्यटनाला फायदा होण्याची अपेक्षा आहे.
  • जागतिक वारसा असलेला ताजमहाल विशेष प्रसंगी पर्यटकांसाठी विनामूल्य राहतो.
  • यामध्ये ईद आणि बकरी ईदच्या नमाजाच्या वेळी ताजमहालमध्ये जाण्यासाठी तिकीट नसते. यावेळी पर्यटकांना मोफत प्रवेश मिळतो.
  • शहाजहानच्या उर्सला ताजमहालमध्ये मोफत प्रवेश आहे. जागतिक वारसा दिनीही ही सुविधा उपलब्ध आहे.

 


Tags: Archaeological Survey of IndiaFree Entrygood newsIndependence Amrit MahotsavmuktpeethNational MonumentTaj mahalचांगली बातमीताजमहालनि:शुल्क प्रवेशभारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागमुक्तपीठराष्ट्रीय स्मारकस्वातंत्र्य अमृतमहोत्सव
Previous Post

राज्यात २०२४ नवे रुग्ण, २१९० रुग्ण बरे! मुंबई ४४३, नाशिक ५१, नागपूर ७० नवे रुग्ण !!

Next Post

परकीय नेतेही कौतुक करतात ते JNPT जवाहरलाल नेहरू बंदर आहे तरी कसं?

Next Post
jnpt

परकीय नेतेही कौतुक करतात ते JNPT जवाहरलाल नेहरू बंदर आहे तरी कसं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!