मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पर्यटकांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एक चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय असा घेण्यात आला आहे की, ऑगस्ट महिन्यात ताजमहालसह सर्व संरक्षित राष्ट्रीय स्मारकांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. ५ ते १५ ऑगस्ट या तारखा यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत परंतु शुक्रवारी ताजमहाल बंद असतो त्यामुळे ६ ते १५ पर्यंत नि:शुल्क प्रवेश मिळेल.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक एनके पाठक यांनी हा आदेश जारी केला आहे. ताजमहाल, फतेहपूर सिक्री, आग्रा किल्ला आणि देशातील सर्व स्मारकांचे तिकीट काउंटर १५ ऑगस्टपर्यंत बंद राहतील. ताजमहालसह सर्व संरक्षित स्मारकांमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश मिळेल.
संपूर्ण देशात ताजमहालसाठी प्रवेश शुल्क हा सर्वाधिक आकारला जातो…
- ताजमहालचे प्रवेश शुल्क हे देशातील सर्वात जास्त शुल्क आहे.
- येथे भारतीय पर्यटकांकडून मुख्य समाधीसाठी ५० रुपये आणि २०० रुपये प्रवेश शुल्क आहे, तर विदेशी पर्यटकांसाठी मुख्य समाधीसाठी १ हजार १०० रुपये आणि २०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
विशेष प्रसंगी पर्यटकांसाठी ताजमहालमध्ये नि:शुल्क प्रवेश!
- ताजमहालमध्ये वीकेंड असो किंवा इतर काही प्रसंग भारतीय या ठिकाणी हजेरी लावतातच, त्यात विदेशी पर्यटकही येतात.
- १५ ऑगस्टपर्यंत ते मोफत करण्याच्या आदेशामुळे शनिवार आणि रविवारच्या दिवशी पर्यटनाला फायदा होण्याची अपेक्षा आहे.
- जागतिक वारसा असलेला ताजमहाल विशेष प्रसंगी पर्यटकांसाठी विनामूल्य राहतो.
- यामध्ये ईद आणि बकरी ईदच्या नमाजाच्या वेळी ताजमहालमध्ये जाण्यासाठी तिकीट नसते. यावेळी पर्यटकांना मोफत प्रवेश मिळतो.
- शहाजहानच्या उर्सला ताजमहालमध्ये मोफत प्रवेश आहे. जागतिक वारसा दिनीही ही सुविधा उपलब्ध आहे.