Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग! १६ राज्यांमध्ये रुग्ण! केंद्राच्या आरोग्य खात्याने कोणती खबरदारी सुचवली?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
omicron central advisory

मुक्तपीठ टीम

देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता हा संसर्ग १६ राज्यांमध्ये पसरल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. गुरुवारी, ५ राज्यांमध्ये ओमायक्रॉनची ८७ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात २३ नवीन प्रकरणे एका दिवसात नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडूत ३३, तेलंगणात १४, कर्नाटकात १२, गुजरातमध्ये ७ तर केरळमध्ये ५ रुग्ण आढळून आली आहेत. आतापर्यंत देशात या प्रकाराची ३०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे सरकारही सतर्क झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञमंडळीही उपस्थित होते.

 

निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये लसीकरण वाढविण्याचा सल्ला

  • व्हर्च्युअल माध्यमातून कोरोना आणि त्याच्या ओमायक्रॉन प्रकाराशी लढा देण्यासाठी राज्यांच्या लसीकरणाच्या प्रगतीचा आणि सज्जतेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आढावा घेतला आहे.
  • पुढील काही महिन्यांत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तेथे लसीकरण वाढवावे, असा सल्लाही दिला आहे.
  • नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सतर्क राहावे असे सुचवण्यात आले आहे.
  • राज्यातील कोरोना चाचण्यांचा सकारात्मकता दर, दुप्पट दर, नवीन रुग्णांचे क्लस्टर तसेच स्थानिक पातळीवरील निर्बंधांवर लक्ष ठेवावे.
  • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना निष्काळजीपणा न करण्याचा सल्ला दिला आहे.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना केली, हे येथे उल्लेखनीय आहे.

 

संसर्ग रोखण्यासाठी राज्यांकडून अपेक्षा

  • नाताळ आणि नववर्ष स्वागत सोहळ्यांमुळे पॉझिटिव्हीटी दर वाढण्याची भीती
  • राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू करावा
  • गर्दीचे मोठे कार्यक्रम रोखण्यासाठी कठोर नियम लागू करावेत.
  • कोरोना संसर्गात वाढ झाल्यास ताबडतोब कंटेनमेंट झोन किंवा बफर झोन अधिसूचित करावेत.
  • पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे कव्हरेज राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ते वाढवले जावे.
  • जीनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टरमधील सर्व नमुने त्वरित पाठवण्यास सांगितले आहे.

राज्यांनी नेमकं काय करायचं?

  • राज्यांना कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी चाचण्या घेण्यास आणि RTPCR आणि RAT चाचण्यांचे ६०:४० गुणोत्तर सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
  • आवश्यकतेनुसार हे प्रमाण ७०:३० पर्यंत वाढविले जाऊ शकते.
  • राज्यांना सर्व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचे वेळेवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष
  • अनेक राज्यांनी कोरोना रुग्णालये रद्द केली आहेत, त्यांना कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृती आराखडा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Tags: coronaMaharashtraOmicronWHOओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरू येथील पुतळ्याच्या विटंबनेचा विधानसभेत निषेध

Next Post

इमारती, रुग्णालयांमध्ये आगींच्या घटनांची सरकारकडून गंभीर दखल

Next Post
Amit satam

इमारती, रुग्णालयांमध्ये आगींच्या घटनांची सरकारकडून गंभीर दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!