मुक्तपीठ टीम
देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता हा संसर्ग १६ राज्यांमध्ये पसरल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. गुरुवारी, ५ राज्यांमध्ये ओमायक्रॉनची ८७ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात २३ नवीन प्रकरणे एका दिवसात नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडूत ३३, तेलंगणात १४, कर्नाटकात १२, गुजरातमध्ये ७ तर केरळमध्ये ५ रुग्ण आढळून आली आहेत. आतापर्यंत देशात या प्रकाराची ३०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे सरकारही सतर्क झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञमंडळीही उपस्थित होते.
निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये लसीकरण वाढविण्याचा सल्ला
- व्हर्च्युअल माध्यमातून कोरोना आणि त्याच्या ओमायक्रॉन प्रकाराशी लढा देण्यासाठी राज्यांच्या लसीकरणाच्या प्रगतीचा आणि सज्जतेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आढावा घेतला आहे.
- पुढील काही महिन्यांत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तेथे लसीकरण वाढवावे, असा सल्लाही दिला आहे.
- नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सतर्क राहावे असे सुचवण्यात आले आहे.
- राज्यातील कोरोना चाचण्यांचा सकारात्मकता दर, दुप्पट दर, नवीन रुग्णांचे क्लस्टर तसेच स्थानिक पातळीवरील निर्बंधांवर लक्ष ठेवावे.
- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना निष्काळजीपणा न करण्याचा सल्ला दिला आहे.
- अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना केली, हे येथे उल्लेखनीय आहे.
संसर्ग रोखण्यासाठी राज्यांकडून अपेक्षा
- नाताळ आणि नववर्ष स्वागत सोहळ्यांमुळे पॉझिटिव्हीटी दर वाढण्याची भीती
- राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू करावा
- गर्दीचे मोठे कार्यक्रम रोखण्यासाठी कठोर नियम लागू करावेत.
- कोरोना संसर्गात वाढ झाल्यास ताबडतोब कंटेनमेंट झोन किंवा बफर झोन अधिसूचित करावेत.
- पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे कव्हरेज राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ते वाढवले जावे.
- जीनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टरमधील सर्व नमुने त्वरित पाठवण्यास सांगितले आहे.
राज्यांनी नेमकं काय करायचं?
- राज्यांना कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी चाचण्या घेण्यास आणि RTPCR आणि RAT चाचण्यांचे ६०:४० गुणोत्तर सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
- आवश्यकतेनुसार हे प्रमाण ७०:३० पर्यंत वाढविले जाऊ शकते.
- राज्यांना सर्व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचे वेळेवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष
- अनेक राज्यांनी कोरोना रुग्णालये रद्द केली आहेत, त्यांना कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृती आराखडा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.