Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिटिंगमध्ये मिटिंग नको! ‘सभागृहात बसून कार्यालय चालवू नये’ लोकसभा अध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्यांना दटावले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Lok Sabha

मुक्तपीठ टीम

मिटिंगमध्ये मिटिंग नको, असे आपण अनेकदा ऐकत असतो. एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना एकमेकांशी कुणी बोलत असले तर त्यांना तसे झापले जाते. आता तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंत्र्यांना दटावले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना “सभागृहात बसून कार्यालयीन कामकाज करू नका” असा सल्ला दिला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह एका खासदाराशी बोलताना दिसले. त्यामुळे संतापलेले ओम बिर्ला म्हणाले, ‘माननीय खासदार, मंत्र्यांनी इथून कार्यालये चालवू नयेत. मंत्र्यांनी खासदारांना कार्यालयात भेटण्यास सांगावे, सभागृहाचा सन्मान राखावा, असे त्यांनी बजावले.

 

सभागृहाच्या कामकाजादरम्यान विविध पक्षांचे सदस्य मंत्र्यांच्या आसनावर जाऊन मंत्रालयाशी संबंधित काही मुद्दे मांडतात, मंत्रीही बोलू लागतात. प्रश्नोत्तराचा तास संपल्याची घोषणा झाल्यानंतरही एका प्रश्नाचे उत्तर देण्यास बिर्ला यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांना रोखले आणि म्हणाले, ‘मंत्री महोदय, बसा… मी म्हणालो की प्रश्नोत्तराचा तास संपला आहे तरीही तुम्ही बोलत आहात.’

आणखी काय घडलं लोकसभेत?

  • लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याला तोंड देण्याच्या तयारीवर केंद्र सरकारकडून माहिती मागितली.
  • कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घेतला आहे त्यांची सरकार युनिक आयडेंटिफिकेशन (आयडी) बनवत आहे.
  • काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला.
  • गेल्या सात वर्षांत आठ लाख ८१ हजार २५४ लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
  • मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, देशात एअर गनने पक्ष्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. यावर पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी या प्रश्नाची जाणीव असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये राज्यांकडून योग्य ती कारवाई केली जाते.
    केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, सुरक्षा संबंधित खर्च योजनेंतर्गत, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२६ वरून ७० वर आली आहे. हे आकडे जुलै २०२१चे आहेत.

Tags: Agriculture Minister Narendra Singh TomarLok Sabha Speaker Om BirlaSpeaker of the Lok SabhaUnion MinisterUnion Minister Giriraj Singhकृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरकेंद्रीय मंत्रीकेंद्रीय मंत्री गिरीराज सिंहलोकसभालोकसभा अध्यक्ष
Previous Post

ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका! तिहेरी चाचणी पूर्ततेपर्यंत ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गात! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

Next Post

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य – गृहमंत्री वळसे-पाटील

Next Post
Dilip-Walse Patil

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य - गृहमंत्री वळसे-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!