Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ओला ईलेक्ट्रिक स्कूटरच्या फॅक्टरीत १० हजारांना रोजगार, महिलांच्या हाती सूत्रं

September 16, 2021
in featured, Trending, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Ola women only factory

मुक्तपीठ टीम

ओलाच्या ई-स्कूटरला लाँचिंगआधीच मिळालेला लक्ष-लक्ष ग्राहकांचा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे तशीच ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी जाहीर केलेली नवी माहितीही तशीच वेगळी आणि चांगली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादन प्रकल्पाची संपूर्ण सूत्रं ही महिलांच्या हाती असतील. म्हणजेच ५०० एकरात पसरलेली ओला फ्यूचर फॅक्टरी संपूर्णपणे महिलांकडून चालवली जाणार आहे. तेथे १० हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगारही मिळेल. हा फक्त महिला कामगारांचा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.

 

या संदर्भात भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे. “आत्मनिर्भर भारताला, आत्मनिर्भर महिलांची गरज आहे! मला हे सांगताना अभिमान वाटतो की, ओला फ्यूचरफॅक्टरी पूर्णपणे महिलांद्वारे चालविली जाईल, तिथे १० हजारांपेक्षा जास्त महिला काम करतील. हा फक्त महिला कामगारांचा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.”

 

Aatmanirbhar Bharat requires Aatmanirbhar women!

Proud to share that the Ola Futurefactory will be run ENTIRELY by women, 10,000+ at full scale! It’ll be the largest all-women factory in the world!!🙂

Met our first batch, inspiring to see their passion!https://t.co/ukO7aYI5Hh pic.twitter.com/7WSNmflKsd

— Bhavish Aggarwal (@bhash) September 13, 2021

दहा हजारांपेक्षा जास्त महिला!

  • भाविश अग्रवाल यांनी याबद्दलचा एक व्हिडीओ ही शेअर केला आहे, ज्यात या योजनेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त महिलांची पहिली बॅच दाखवली आहे.
  • त्यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, कंपनीने या आठवड्यात पहिल्या बॅचचे स्वागत केले आहे.
  • पूर्ण क्षमतेने सुरु झाली की फ्यूचर फॅक्टरी १० हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगार देईल.
  • जे जगातील सर्वात मोठे आणि एकमेव सर्व महिला कामगार असलेले ऑटोमोटिव्ह उत्पादन युनिट असेल.

 

India’s women will bring the EV revolution from India to the world!

When women are equal participants in India’s economic growth, India will lead the world!#JoinTheRevolution pic.twitter.com/65LBJOcykM

— Bhavish Aggarwal (@bhash) September 13, 2021

महिलाच सूत्रधार!

  • ओला कंपनीने उत्पादन कौशल्यांच्या मुख्य क्षेत्रांमध्ये महिला कामगारांना प्रशिक्षण आणि अतिरिक्त कौशल्ये प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे.
  • त्या ओला फ्यूचरफॅक्टरीमध्ये तयार केलेल्या प्रत्येक वाहनाच्या संपूर्ण उत्पादनासाठी जबाबदार असतील.
  • ओलाने गेल्या वर्षी तमिळनाडूमध्ये आपला पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी उभारण्यासाठी २,४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.
  • बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीही सुरू होईल.

पाहा व्हिडीओ


Tags: ola future factoryola scooterwomen only facotryओलाओला इलेक्ट्रिक स्कूटरओला महिलांचाच कारखाना
Previous Post

आजचा श्रावण बाळ! लसीकरणासाठी आईला हातात उचलून तो चालला!

Next Post

आयुर्वेदासह भारतीय उपचार पद्धतींना जागतिक मान्यता मिळवण्यासाठी महत्वाचं पाऊल

Next Post
Ayurveda medicine

आयुर्वेदासह भारतीय उपचार पद्धतींना जागतिक मान्यता मिळवण्यासाठी महत्वाचं पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!