मुक्तपीठ टीम
ओला इलेक्ट्रिकने स्वातंत्र्यदिनी इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1 लॉन्च केली. ओलाने फक्त ४९९ रुपयांमध्ये बुकिंग सुरू केली, ज्याला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आता टेस्ट ड्राइव्ह सुरु झाल्या आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये ओलाने इलेक्ट्रिक स्कूटरच्या चाचणी राइड्स ऑफर केल्या आहेत. त्यावर ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद प्रचंड उत्साहवर्धक असल्याने ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पण ओलाने महाराष्ट्रातील चाहत्यांची आतुरता मात्र तशीच ठेवली आहे. टेस्ट राइडच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात टेस्ट राइड कधी सुरु करणार, याबद्दल चौकशी केली जात आहे.
Ab rulaoge kya!! ❤️❤️ pic.twitter.com/2mrhptKmad
— Bhavish Aggarwal (@bhash) November 12, 2021
ओला इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांनी टेस्ट राइड घेतल्यानंतर चांगला प्रतिसाद दिला आहे. टेस्ट ड्राईव्ह कॅम्प्समध्ये ओला स्कूटरची टेस्ट राइड घेत असलेल्या ग्राहकाचा टि्वटरवर रिव्ह्यू व्हिडिओ शेअर करताना भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले – आता तू रडवणार का?
Everyone wants to test ride the Ola S1! Even if some are too young 🙂 very excited to see so much excitement from our customers! Sharing 4 videos of test rides in Bengaluru, Delhi, Ahmedabad and Kolkata. Rolling out to more cities soon! pic.twitter.com/AY3czFJRvZ
— Bhavish Aggarwal (@bhash) November 12, 2021
त्यांनी माहिती दिलीय, आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ मॅसेज दिल्ली-एनसीआरच्या टेस्ट ड्राईव्ह कॅम्पचा आहे, जिथे ग्राहकाने त्याच्या रिव्ह्यूत ओला स्कूटरचे वर्णन इतके उत्कृष्ट आणि जिवंत केले आहे की भाविश यांनी हा प्रश्न मजेदार हार्ट इमोजीसह विचारला आहे.
Here’s their experience riding the Ola S1 in Delhi! pic.twitter.com/MyXMYIM1DH
— Bhavish Aggarwal (@bhash) November 12, 2021
ओला ग्राहकांनी आपल्या रिव्ह्यूमध्ये सांगितले आहे की, स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, उत्तम पिकअप आणि चांगली रेंज यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. भाविश अग्रवालने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एकामागून एक अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओंमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या शहरांमध्ये चालवल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत.
This is in Bangalore: Rain or not, it’s a great ride! pic.twitter.com/v3B7ZMLHV8
— Bhavish Aggarwal (@bhash) November 12, 2021
पाहा व्हिडीओ: