मुक्तपीठ टीम
भारतीय बाजारात लवकरच येणारी ओला इलेक्ट्रिक स्कूटर खूप चर्चेत आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या स्कूटरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २४ तासात स्कूटरला १ लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही चांगली बातमी शेअर केली आहे.
एका चार्जिंगमध्ये १५० किलोमीटरची रेंज देणारी ओलीची ई-स्कुटर फक्त ४९९ रुपयांमध्ये बूक करता येते. तीन रंगात येणार असलेली ओलाची ई-स्कूटर अवघ्या १८ मिनिटांमध्ये पन्नास टक्के चार्ज होऊ शकेल. त्यामुळेच एक लाख किंमत असूनही २४ तासात लाखाहून जास्त बुकिंग झाले असावे.
बुकिंग अवघ्या ४९९ रुपयांत
- कंपनीने अलीकडेच ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू केली होती.
- ही बुकिंग ४९९ रुपयांत करता येते.
- खास गोष्ट अशी आहे की, हे बुकिंगचे पैसे बुकिंग न झाल्यास परत ही दिले जातात.
- पहिल्या २४ तासात स्कूटरची १ लाखाहून अधिक बुकिंग होणे हे मोठे रेकॉर्ड आहे.
भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीची एक उत्तम सुरुवात आहे. आमच्यात सामील झालेल्या आणि स्कूटर बुक केलेल्या १ लाखाहून अधिक ग्राहकांचे आभार.”
ओलीची ई-स्कूटर…देखणी आणि हायटेक फिचर्स!
- ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची छायाचित्रे ऑनलाइन व्हायरल झाली आहेत. ज्यावरून त्याच्या रंगांचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- निळा, काळा आणि गुलाबी या तीन कलर ऑप्शन्समध्ये येईल. कंपनीने स्कूटरचे काही टीझरही जाहीर केले आहेत.
- कंपनीच्या टेस्ट ड्राइव्ह व्हिडीओमध्ये असे सांगितले गेले होते की, स्कूटरला त्याच्या विभागातील सर्वात मोठी बूट स्पेस आणि चार्जिंग रेंज मिळेल.
- तसेच ही स्कूटर स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह असेल.
हायस्पीड चार्जिंग मोठी रेंज!
- ही स्कूटर एकाच चार्जमध्ये १५० किमी पर्यंतची रेंज देईल.
- तसेच, केवळ १८ मिनिटांत ० ते ५०% पर्यंत चार्ज आकारले जाऊ शकते.
- स्कूटरला फुल-एलईडी लाइटिंग, वेगवान चार्जिंग, फ्रंट डिस्क ब्रेक अशी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.
- याची टॉप स्पीड ९० किमी प्रतितास असू शकते. या स्कूटरची किंमत १ लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.