मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओकाया ईस्कूटर ‘फास्ट’ बाजारात आणत आहे. ओकाया वेबसाईट किंवा डिलरच्या माध्यमातून १ हजार ९९९ रुपयात बुकींग करता येणार आहे. ओकाया फास्ट इतर ईस्कूटरच्या तुलनेत अधिक वेगवान चार्जिंग आणि अधिक मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
ओकाया फास्टची सुरुवातीची किंमत ८९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. कंपन्यांनी ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ईवीएक्स्पो २१ मध्ये ही स्कूटर सादर केली.
यासोबतच ओकायाने ईमोटरसायकल फेराटोही सादर केली. या ईस्कूटरला २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. ईस्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर १५० ते २०० किमीपर्यंत धावू शकेल तसंच प्रतितास ६०-७० किमीचा या ईस्कूटरचा वेग आहे.
देशातल्या ऑटोमोबाईल क्षेत्रात वेगवान बदल होत असून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे कल वाढतोय. ओकाया कंपनीचे गेल्या ६ महिन्यात २२५ डिलर वाढलेत .
पाहा व्हिडीओ: