मुक्तपीठ टीम
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून सुरु करण्यात आली आहे.
राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती, २ पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.
वसतिगृहाचे नाव, पत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बी.डी.डी.चाळ, वरळी-११८, मुंबई-४०००१८, संपर्क क्र. ८८३०३१६५५३ ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी-११६, बी.डी.डी.चाळ, वरळी-११६, मुंबई-४०००१८, संपर्क क्र. ८८३०३१६५५३ ; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, वरळी-११६, बी.डी.डी.चाळ, वरळी-११६, मुंबई-४०००१८, संपर्क क्र.९९८७७९०४३० असे पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.