Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अक्कलकुव्यात वृक्ष लागवडीतून रोजगार निर्मिती करा- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

November 25, 2021
in घडलं-बिघडलं, निसर्ग, सरकारी बातम्या
0
Dattatray Bharne

मुक्तपीठ टीम

 नंदुरबार येथील मौजे भगदरी, मौजे भांगरापाणी, मौजे काठी व जौजे मुलगी, शहादा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 

 नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवी, नाशिकचे वनसंरक्षक अ.मो. अंजनकर, धुळे वनसंरक्षक डी. डब्लु. पगार, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, नंदुरबारचे सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी आर.ए.कुलकर्णी आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 राज्यमंत्री भरणे म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यातील संबंधीत गावात सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल. नियमानुसार काम करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य लाभेल या दृष्टीने काम करावे असेही ते म्हणाले.

 

स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

अक्कलकुवा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक आदिवासींना कामे उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबविण्यात यावे असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जलसंधारण कामांबाबत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवी, मृद व जलसंधारणचे सहसचिव डी.एस.प्रक्षाळे, जलसंधारणचे अवर सचिव अ.र.जगताप, उपविभागीय अधिकारी सुनिल पवार उपस्थित होते.

 

राज्यमंत्री भरणे म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तेथील स्थानिक आदिवासींना धरणातील गाळ काढणे अशी जलसंधारणाची कामे देण्यात यावी. कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग यांनी संयुक्तिकरित्या स्थानिक आदिवासी,  शेतकरी यांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबविण्यास सहकार्य करावे, असेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.


Tags: Dattatray Bharneemploymentmuktpeethnandurbartree plantationदत्तात्रय भरणेनंदुरबारमुक्तपीठरोजगार हमी योजनावृक्ष लागवड
Previous Post

व्हाईस अ‍ॅडमिरल पवार यांना परमविशिष्ट सेवा पदक!

Next Post

मुंबई शहरातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

Next Post
goverment Hostel

मुंबई शहरातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!