मुक्तपीठ टीम
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी पक्षभेद विसरून सर्वपक्षीय ओबीसी नेते एकत्र येणार आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यात येणार आहे.
चिंतन बैठकीचे आयोजन
- ओबीसी आरक्षण धोक्यात येण्यावर मार्ग काढण्यासाठी तसेच ओबीसींच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नेमकं काय करावं, यावर विचार करावा यासाठी २६ आणि २७ तारखेला चिंतन शिबिर आयोजित केले असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
- या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत.
- या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार-
- ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मात्र, कोरोनाचं संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे.
- त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत.
- कोर्टाने केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत.
- तसेच कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का याबाबत कोर्टाचं मतही जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
४० ते ५० हजार जागांवर प्रश्न निर्माण झाला-
- ओबीसींचा इंम्पेरीयल डेटा मागण्यासाठी केंद्र सरकारला दोन पत्र लिहिली आहेत.
- पण केंद्राकडून तो डेटा मिळाला नाही.
- मुख्यमंत्र्यांनीही इम्पेरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे.
- इंम्पेरिकल डेटा उपलब्ध न झाल्याने राज्यातील ४० ते ४५ हजार जागांवर प्रश्न निर्माण झाला आहे.
- यात महानगरपालिका, सहकार क्षेत्र ते ग्रामपंतायत आणि इतर जागा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं वडेट्टीवार म्हणालेत.