मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाचे सरसान्याधीश शरद बोबडे सेवानिवृत्त झाल्यानंतर आज न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतले आहे. शपथ घेताच ते देशातील ४८ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती भवनात शपथ ग्रहण समारंभ संपन्न झाला.
गेल्या महिन्यात शदर बोबडे यांनी सरन्यायाधीशपदासाठी एन. व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती. या शिफारशीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली होती. रमणा हे १६ महिने म्हणजेच २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणांची कारकीर्द
- आंध्र प्रदेशात २७ ऑगस्ट, १९५७ रोजी कृष्णा जिल्ह्यातील पुन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये एन. व्ही. रमणा यांचा जन्म झाला.
- एन. व्ही. रमणा यांनी विज्ञान आणि कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
- १० फेब्रुवारी, १९८३ रोजी एन. व्ही. रमणा सेवेत रुजू झाले.
- त्यानंतर एन. व्ही. रमणा यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केले.
- २७ जून २००० रोजी एन. व्ही. रमणा यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
- त्यानंतर एन. व्ही. रमणा यांनी १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.
- तर आता एन. व्ही. रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.