मुक्तपीठ टीम
क्रिकेटचा देव आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला आता कोणीही आपला गुरू बनवू शकतो. सचिन तेंडुलकर आता मोफत ऑनलाईन कोचिंग चालवणार आहे. सचिन लाइव्ह इंटरॅक्विव्ह वर्गाची मालिका घेण्यास तयार आहे. हे वर्ग अनअॅकेडमी शिकणाऱ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असतील.
ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअॅकेडमीने सचिन तेंडुलकरांसोबत करार केला आहे. या कराराचा भाग म्हणून, अनअॅकेडमी लनर्सला लाइव्ह इंटरक्विव्ह वर्गांची मालिका प्राप्त होईल. या माध्यमातून फलंदाज सचिन तेंडुलकर प्रशिक्षण देणार आहे. सचिनकडून सल्लादेखील घेता येणार आहे. हे वैशिष्ट्य अनअॅकेडमी प्लॅटफॉर्मवरील प्रत्येकासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. सचिन तेंडुलकरची अनअॅकेडमीसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.
Thanks @gauravmunjal! Happy to be part of the team.
Learning never stops & @unacademy is championing the vision of making it accessible through technology.
Looking forward to sharing my experiences as well as learning with people across the world. https://t.co/nR9k6Fzs6n
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 23, 2021
सचिन तेंडुलकरने दिलेल्या माहितीनुसार, ‘तो विनामूल्य सत्र ऑनलाइन चालवणार आहे. यात कोणीही सामील होऊ शकतात. ही संपूर्ण कल्पना त्याचे अनुभव शेअर करण्याबद्दल आहे. मी बर्याच मुलांशी थेट संवाद साधला आहे, परंतु डिजिटल संवाद प्रथमच होईल. ही कल्पना यापुढे काही शंभर तरुणांपुरतीच मर्यादित राहणार नाही, तर लाखोंपर्यंत जाईल. हे त्यांचे ध्येय आहे.
पाहा व्हिडीओ: