Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत नकलीनंतर आता यूपीत कोरोना लस म्हणून गॅसचं इंजेक्शन!

कोरोनानंतरही माणसं सुधारली नाहीत...

August 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या या संकटकाळात लसीकरण हीच एक आशा दिसत आहे. मात्र काही लोक पैशासाठी अगदी जीवनरक्षक औषधांचाही काळाबाजार करत आहे, तर काही बनावट लस वापरून फसवणूकही करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत बनावट लसीकरणाच्या घटना उघडकीस आल्या असतानाच असताना वाराणसीत २० रुपयात गॅसची लस देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पर्यवेक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका जागरूक तरुणाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

 

कोरोनाच्या नावाखाली भलत्याच लसीचं प्रकरण काय?

  • काशीपूर गावात शनिवारी संध्याकाळी, पीएचसीमध्ये तैनात आरोग्य पर्यवेक्षक मोहन राम गावकऱ्यांना २० रुपयात कोविशिल्डच्या नावाने लस देत होता.
  • गावातील एका तरुणाने नोंदणी न करता लस दिल्यानंतर प्रमाणपत्र मागितल्यावर तो धमकावू लागला.
  • यामुळे त्या तरुणाला संशय आला आणि त्याने सिंधोरा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
  • घटनास्थळी पोहचलेले एसएसआय संजीत बहादूर सिंह यांनी लसीची कुपी जप्त केली आणि प्रभारी वैद्यकीय अधिकारी पिंद्रा डॉ एचसी मौर्य यांना माहिती दिली.

 

२० रुपयात कोरोनाऐवजी गॅसची लस!

  • लसीच्या कुपीच्या तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, ही लस डेक्सोना आणि असिलॉक आहे.
  • डेक्सोना अॅन्टी अॅलर्जी आहे, तर असिलोक गॅसचे इंजेक्शन आहे.
  • पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, पैसे कमवण्याच्या उद्देशाने तो गावकऱ्यांना २० ते २५ रुपये दरात लस देत होता.
  • पिंड्रा पीएचसीमध्ये तैनात आरोग्य कर्मचारी बिरबलच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

 

एक आठवडा गावोगाव देत होता लस

  • आरोपी आरोग्य पर्यवेक्षक, ज्याने कोरोना लसीच्या नावाने अॅलर्जीविरोधी लस देऊन वसूली केली.
  • तो सिंधोरा पोलीस स्टेशन परिसरातील गडखडा गावाचा रहिवासी आहे.
  • गावकरी रत्नेश पांडे यांनी सांगितले की, गेल्या एक आठवड्यापासून तो काशीपूर आरोग्य केंद्राच्या आसपासच्या गावात फिरत होता आणि कोविशील्डच्या नावाने बनावट लस देत होता आणि २० ते ५० रुपये वसूल करत होता.
  • पोलीस आरोपींद्वारे कोरोना विरुद्ध लसीकरण केलेल्या सर्व लोकांची यादी तयार करत आहेत.

 

दुष्परिणान नसल्याने भलत्याच लसींचा फसवणुकीसाठी वापर

  • पिंड्रा पीएसचीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. सी. म्हणाले की, डेक्सोना आणि असीलॉक लसीचे कोणतेही परिणाम होत नाही, यामुळे आरोपींनी याचा गैरफायदा घेत लोकांना लस दिली.
  • डॉ.एच.सी. मौर्य यांनी सांगितले की, आरोपी हा आमच्या रुग्णालयात आरोग्य पर्यवेक्षक आहे.
  • तो कोरोना लसीच्या नावावर अॅन्टी अॅलर्जी आणि गॅसवरील लस देत होता.
  • हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
  • पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
  • यात आणखी कोणी सहभागी आहे का, याची चौकशी केली जाईल.

Tags: coronacovishield vaccinemumbaithanevaccinationकोरोनाडेक्सोनाडॉ.एच.सी. मौर्य
Previous Post

इंपिरिकल डाटासंदर्भात बाजू मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

Next Post

आदिवासी दिनी आदिवासींच्या प्रश्नांवर माकप आक्रमक, तहसिलचे गेट तोडत केला बेमुदत सत्याग्रह!

Next Post
tribes issues

आदिवासी दिनी आदिवासींच्या प्रश्नांवर माकप आक्रमक, तहसिलचे गेट तोडत केला बेमुदत सत्याग्रह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!