मुक्तपीठ टीम
अनेक संशोधनं अशी असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. नुकतीच माध्यमांमध्ये आलेली नवी बातमी अशीच आहे. ही बातमी आहे एका नव्या अॅपची. अमेरिकन शास्त्रज्ञांनी हे अॅप विकसित केले आहे. जे कोणाचाही शिंकण्याचा आणि खोकण्याचा आवाज ऐकेल आणि तो कोणत्या आजाराने ग्रस्त आहे ते सांगेल.
- हे अॅप हायफी इंक या अमेरिकन कंपनीने विकसित केले आहे.
- विविध प्रकारच्या आजारांमध्ये येणाऱ्या खोकल्याच्या लाखो आवाजाचा समावेश या अॅपमध्ये करण्यात आला आहे.
- त्या डेटाचा वापर करून अचूक माहिती दिली जाईल
- हे आवाज आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने सांगतात की, रुग्णाला कोणत्या समस्या असू शकतात.
- भविष्यात जर दमा, न्यूमोनिया किंवा कोरोना सारखा आजार असेल तर व्यक्ती किती गंभीर आहे हे देखील कळेल.
डॉक्टरपेक्षा अॅपचे जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरकडे जातो तेव्हा समस्या काय आहे हे फुफ्फुसांचे डॉक्टर सहज सांगू शकतात. हे अॅप त्याच प्रकारे कार्य करते आणि डॉक्टरांपेक्षा वेगवान परिणाम देऊ शकते. ही पद्धत सोपी आहे आणि डॉक्टरांकडे जाण्यापासूनची फी वाचवू शकते.
केव्हा उपलब्ध होणार अॅप?
- संशोधकांच्या मते, हा अभ्यास स्पेनमध्ये केला जात आहे.
- हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले जाते.
- अॅप मोठ्या आवाजाला कसा प्रतिसाद देतो याची तपासणी केली जात आहे.
- चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे अॅप सामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते.
व्यक्तीला खोकला का येतो?
- श्वसनमार्गामध्ये काही समस्या आल्यावर व्यक्तीला खोकला येतो.
- शरीरातील पेशी मेंदूला संदेश पाठवतात.
- मेंदू स्नायूंना परत एक सिग्नल पाठवतो आणि फुफ्फुसात हवा भरून छाती आणि पोट फुगवायला सांगतो.
- जेव्हा हे घडते तेव्हा व्यक्तीला खोकला येतो.