मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँकेने नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी दिली आहे. १ ऑगस्टपासून पगाराच्या दिवशी सुट्टी आली तरी पगार मात्र खात्यात जमा होईल. तसंच गृह कर्ज किंवा अन्य कोणताही ईएमआय खात्यातून वजा केला जाईल. याकरता रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात‘नॅच’च्या नियमांत बदल केले असून, आता आठवडाभर या सेवा मिळणार आहेत. म्हणजेच सार्वजनिक सुट्टी आल्यानं पगार, पेन्शन आणि ईएमआय पेमेंट्ससारख्या महत्त्वपूर्ण व्यवहारासाठी कामाच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार नाही.
साधारण दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचे पगार होतात. मात्र याच कालावधीत शनिवार, रविवार किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर पगारदार वर्गाला खात्यात पगार जमा होण्यासाठी सोमवारपर्यंत किंवा कामकाजाच्या दिवसापर्यंत थांबावं लागते. मात्र आता भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्मचाऱ्यांची ही अडचण कायमस्वरुपी दूर केली आहे. बँकेने रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसचा (RTGS) लाभ आठवड्याचे सर्व दिवस करून देण्यासाठी बँकांमध्ये नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात ‘नॅच’संबंधी (NACH) नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक कर्मचाऱ्यांचे पगार होतात. मात्र याच कालावधीत काहीवेळा शनिवार, रविवार किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर नोकरदार वर्गाला खात्यात पगार जमा होण्यासाठी सोमवारपर्यंत किंवा कामकाजाच्या दिवसापर्यंत थांबावं लागतं. याच पाश्वभूमीवर आता आरबीआयनं कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. बँकेने रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसचा लाभ आठवड्याचे सर्व दिवस करून देण्यासाठी बँकांमध्ये नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात ‘नॅच’संबंधी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील सर्व दिवस आरटीजीएस सेवा ग्राहकांना उपलब्ध राहील.
नॅच म्हणजे काय?
- नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात नॅच ही बल्क पेमेंट सिस्टम आहे.
- ती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) चालवली जाते.
- बँकेतील आपल्या खात्यात जमा होणारा पगार, पेन्शन, लाभांश आणि व्याज यासह वीज, गॅस, टेलिफोन, पाणी इत्यादी बिलं, कर्ज ईएमआय, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा हप्ता यांचं पेमेंट करण्याची सुविधा याच यंत्रणेद्वारे दिली जाते.
- नॅच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) साठी लोकप्रिय आणि अग्रगण्य डिजिटल मोड म्हणून उदयास आले आहे.
आपला पगार सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार-
- ही नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीही कर्मचार्यांच्या बँक खात्यात पगार जमा केला जाऊ शकतो.
- १ ऑगस्टपासून आठवड्याचे सर्व दिवस नॅचची सेवा उपलब्ध होणार आहे.
- याचा लाभ सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांनादेखील होणार आहे.