Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलतेची शक्यता, मुंबई लोकल लवकरच सर्वांसाठी?

कोरोनाची लाट ओसरत असल्याने राज्यभरातून वाढती मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
train (3)

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने, राज्यात सरकारकडून आणखी निर्बंध शिथिल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुकानांच्या वेळांमध्ये बदल, मुंबई लोकलबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या शक्यता आहे. विदर्भ कोरोनामुक्तीकडे चाललेला असताना बीड वगळता मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रही अधिक शिथिलतेच्या अपेक्षेत आहे.

 

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर ओसरत झाल्यानंतर बहुतेक राज्यांमध्ये अनलॉक सुरू झाले आहे. जरी अशी काही राज्ये आहेत जिथे निर्बंध शिथिल केले गेलेले नाहीत. कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात नवीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. हे लक्षात घेता, कोरोना प्रकरणांवर लक्ष ठेवणाऱ्या राज्याच्या सल्लागारांनीही निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणण्याची शिफारस केली आहे.

 

दुकानांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण

कोरोना व्यवस्थापनातील राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. आता दुकानांमध्ये काम करणाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिल्यास दुकानांच्या वेळा वाढविण्यात येऊ शकतात.

 

दुकानाच्या वेळा वाढवणार

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, ज्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, अशा जिल्ह्यात सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यत उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. यामध्ये ०.१ ते ०.२ टक्के पर्यंतचा पॉझिटिव्ह दर असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश असेल. अर्थात याबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

 

लोक प्रवासावर निर्णय

कोविड टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले की लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबात लवकर निर्णय घेण्यात येईल. कोरोनाच्या कठोर मार्गदर्शक सूचनांसह उपनगरी सेवा हळूहळू सुरु केल्या जाऊ शकतात.


Tags: coronaMaharashtraMumbai localRajesh Topeकोरोनामहाराष्ट्रमुंबई लोकलराजेश टोपे
Previous Post

“पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत”: शरद पवार

Next Post

सुट्टीच्या दिवशीही बँक व्यवहार, पगार मिळणार, खात्यातून ईएमआयही जाणार!

Next Post
RBI (2)

सुट्टीच्या दिवशीही बँक व्यवहार, पगार मिळणार, खात्यातून ईएमआयही जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!