मुक्तपीठ टीम
काही वेळेस महत्त्वाच्या क्षणी काही अडचणी निर्माण होतात. एखादा अपघात घडतो त्यावेळेस मदत म्हणून निधी गोळा केला जातो. बॅंकेच्या व्यवहारात अडचणी येतात किंवा घटना कळल्यास आपल्याला त्वरित मदत करता येत नाही. पण आता मदत करणे ‘क्यूआर कोड’ च्या माध्यमातून शक्य आहे. कारण या सर्व अडचणी लक्षात घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बोरगावच्या विनायक गायकवाड या तरूणाने क्यूआर कोडच्या मदतीने डिजिटल इन्फॉमेशन कार्ड ही संकल्पना आणली आहे. या कार्डमुळे अपघात झालेल्या व्यक्तीसंदर्भात आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींसंदर्भात माहिती मिळते. या संकल्पनेच्या पेटंटसाठी विनायक याने अर्ज केला आहे.
या संकल्पनेद्वारे संकटातील तो क्षण सहज आणि स्मार्टली हाताळता येईल. विनायक याने मॅकेनिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर शिक्षणाचा वापर करून या संकल्पनेचा शोध जानेवारीमध्ये लावला आहे. याद्वारे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव, पत्ता, फोटो, रक्तगट आणि त्याचे नातेवाईक, संपर्कातील व्यक्तींची नावे, नंबर अशी सर्व माहिती एका स्कॅनवर उपलब्ध होणार. त्यांच्या वाहन विम्याची माहिती मिळताच त्वरित रूग्णालयात दाखल करता येते. प्रत्येकास एक क्यूआर कोड देऊन एका ३७ अंकी खात्याशी जोडले जाईल. यात मोबाईल क्रमांक देऊन ओटीपी व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर डीआयसी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता इत्यादी माहिती भरून डीआयसी तयार केले जाते.
या डीआयसी कार्डमध्ये महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवले जाते. ज्यावेळी डीआयसी कार्ड स्कॅन केल्यास किंवा तपासल्यास त्यासंबंधित संदेश डीआयसी कार्डधारकांना आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना जाणार आहे. त्यामुळे झटपट मदत मिळवणे शक्य होईल.
पाहा व्हिडीओ: