मुक्तपीठ टीम
तहान लागलं की पाणी आणि प्रवासात असलं की तोंडी येते ती बिस्लेरी! भारतीयांच्या ओठी रुळलेला बिस्लेरी हा पार्ल्याच्या चौहाण कुटुंबांचा ब्रँड. पण आता टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आता पॅकेज्ड वॉटर कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनल खरेदी करणार आहे.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आता बिस्लेरी ब्रँड ७० अब्ज रुपयांना म्हणजे सुमारे ८५७.३८ दशलक्ष विकत घेतील. टाटा समूह आणि बिस्लेरी यांच्यात या डीलबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
टाटा समूहाने रमेश चौहान यांच्या मालकीची बिस्लेरी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मिनरल वॉटर लीडिंग ब्रँड बिस्लेरीचे मालक रमेश चौहान हे वृद्धापकाळ आणि वाईट प्रकृतीमुळे हा करार करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
चौहान टाटांना संपूर्ण स्टेक विकणार नाहीत!
- मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणार्या पॅकेज्ड वॉटर ब्रँड बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी पुष्टी केली आहे.
- त्यांची कंपनी बिस्लेरी दिग्गज टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सशी त्यांचे स्टेक विकण्यासाठी बोलणी करत आहे.
- परंतु, अजूनही चर्चा सुरू असल्याने करारावर स्वाक्षरी झालेली नाही. अजून काहीही अंतिम नाही.
- चौहान यांनी म्हटलं की, ते कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकण्याचा विचार करत नाही. पण भागीधारीतील एक भाग विकण्यासाठी टाटांशी चर्चा सुरू आहे.
तीस वर्षांपूर्वी चौहान यांनी आपला सॉफ्ट ड्रिंक व्यवसाय अमेरिकन कोका-कोला कंपनीला विकला. त्यांनी १९९३ मध्ये Thums Up, Gold Spot, Citra, Maaza आणि Limca सारखे ब्रँड कंपनीला विकले. त्यानंतर २०१६मध्ये त्यांनी सॉफ्ट ड्रिंक व्यवसायात पुन्हा प्रवेश केला परंतु त्याच्या ‘Bisleri Pop’ उत्पादनाला फारसे यश मिळाले नाही.