Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात कुठेही ड्रोन उडवायचं असेल तर ‘हे’ नक्की करा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
drone

मुक्तपीठ टीम

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन बनविणे, विक्री आणि खरेदी, ऑपरेशन यासंबंधीच्या नियमांची अधिसूचना जाहीर केली आहे. नवीन नियम १२ मार्चपासून अंमलात आणले जाणार आहेत. या नियमांना ‘मानवरहित विमान प्रणाली नियम २०२१’ असे नाव देण्यात आले आहे. या नियमांनुसार आता ड्रोनचे उत्पादन, ऑपरेशन, आयात, निर्यात, हस्तांतरण आणि व्यापार यासाठी सरकारकडून पूर्व मान्यता घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दहावीपर्यंत शिक्षण घेणे अनिर्वाय

देशभरात २५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे ड्रोन उडवण्यासाठी आता लायसन व प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. विना प्रशिक्षण आणि लायसन ड्रोन उडवल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. रिमोट पायलट लायसनसाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त तसेच शासकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे.

काय आहेत नवीन नियम?

  • ड्रोनला रेगुलेट आणि मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी डीजीसीएची असेल.
  • वजनानुसार, ड्रोनला नॅनो, मायक्रो, स्मॉल, मध्यम आणि लार्जमध्ये विभागले गेले आहेत.
  • नॅनो ड्रोन वगळता इतर सर्व ड्रोन चालविण्यासाठी परमिट, लायसन आणि विमा घेणे आवश्यक केले आहे.
  • आधीपासूनच देशात सर्व ड्रोनला उड्डाण करण्यापूर्वी नवीन नियमांची पालन करावे लागणार आहे.
  • अपघात झाल्यास मोटार वाहन कायद्याच्या धर्तीवर झालेल्या नुकसान भरपाई करण्याची तरतूदही नवीन नियमांत करण्यात आली आहे.
  • तसेच विना लायसन ड्रोन उडविणे, शस्त्रे व धोकादायक गोष्टी वाहून नेणे, प्रतिबंधित भागात उड्डाण करणे आणि छायाचित्रण करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
  • विमानतळांवर, लष्करी संस्थांजवळ आणि आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये २५ किलोमीटरपर्यंत ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे.
  • राज्य सचिवालय, विधानसभा आणि संरक्षण संस्थांच्या आसपासही ड्रोनना उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ड्रोनच्या उड्डाणांच्या उंचीची मर्यादा देखील निश्चित

  • नॅनो ड्रोनचे वजन २५० ग्रॅम पर्यंत मर्यादित असेल, यापेक्षा जास्त वजनाच्या सर्व ड्रोन्सवर नवीन नियम लागू होतील.
  • नॅनो ड्रोन १५ मीटर उंचीवर, मायक्रो-ड्रोन ६० मीटर आणि स्मॉल ड्रोन १२० मीटर पर्यंत उड्डाण करू शकेल.
  • ड्रोन हरवल्याची तसेच तुटलेल्याची माहिती सरकारला द्यावी लागेल.
  • छायाचित्रण करताना एखाद्याच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी लागते.

नियम बनवण्यात यांची मोलीची भूमिका

  • राजस्थान विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डीजीसीए नवी दिल्लीचे सहायक संचालक डॉ. रामस्वरूप मंगलाव यांनी ड्रोनचे नियम बनविण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत.
  • मंगलाव हे गंगानगर जिल्ह्यातील बिरामणा गावतील रहिवासी आहेत.
  • मंगलाव हे कायद्यात डॉक्टरेट असून, त्यांनी सरकारी वकील म्हणून सीबीआयमध्ये काम केले आहे.

Tags: dronefly dronelicensetrainingड्रोन कॅमेरानॅनो ड्रोनमानवरहित विमान प्रणाली नियम २०२१
Previous Post

#मुक्तपीठ सोमवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

आयटीआय विद्यार्थ्यांना २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क परतावा

Next Post
आयटीआय क्षेत्र

आयटीआय विद्यार्थ्यांना २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क परतावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!