मुक्तपीठ टीम
कावासाकी ब्रँड प्रिमियम स्पोर्ट्स बाइक्ससाठी ओळखला जातो. त्यांच्या रेंजमध्ये अनेक प्रकारच्या स्पोर्ट्स बाइक्स आहेत. कावासाकी कंपनीने आता लहान मुलांना लक्षात घेऊन ज्युनिअर इलेक्ट्रिक बाइक बनवली आहे. ८ वर्षांपर्यंतची मुले ही इलेक्ट्रिक बाइक चालवू शकतात. कंपनीने या बाईकमध्ये अनेक फीचर्स तसेच ड्रायव्हिंग मोड देखील दिले आहेत. कावासाकीची ही इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच झाली नाही, परंतु काही काळात भारतीय बाजारात ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे.
कावासाकी इलेक्ट्रोडचे कही खास फिचर्स…
- या इलेक्ट्रिक बाइकमध्ये ३६V ५.१ Ah बॅटरी वापरली आहे.
- ही बाईक एकदा चार्ज करून २.५ तास वापरली जाऊ शकते.
- ही बाईक चार्ज करण्यासाठी २.५ तास लागतात.
- ही रियर व्हील ड्राइव्ह बाइक आहे.
- बाईकचे मागील फ्लायव्हील बॅटरीला जोडलेले आहे.
- ही बाईक सामान्य होम चार्जरने देखील चार्ज केली जाऊ शकते.
- या बाईकसाठी वेगळे चार्जिंग सॉकेट बसवण्याची गरज नाही.
- बॅटरी ५०० वेळा चार्ज केल्यानंतर त्याची क्वालिटी २० टक्क्यांनी घसरते.
- बॅटरीची क्वालिटी १०० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत खाली येईल.
- या बाइकमध्ये अॅल्युमिनियम फ्रेमचा वापर करण्यात आला आहे.
- या बाइकमध्ये कोणत्याही प्रकारचे सस्पेंशन नाही.
- या इलेक्ट्रिक बाइकमध्ये १६-इंच अॅल्युमिनियम व्हीलही देण्यात आले आहेत.
- कंपनीने या इलेक्ट्रिक बाइकमध्ये अॅडजस्टेबल ब्रेक लीव्हर आणि रियर डिस्क ब्रेक सारखे फीचर्सही दिले आहेत.
- आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १०९९ डॉलर्स आहे म्हणजे भारतीय किंमत ८५,५०० रुपये.