मुक्तपीठ टीम
इंडियन प्रीमियर लीगच्या सध्या सुरु असलेल्या १४ व्या हंगामावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आता पर्यंत या हंगामातील २९ सामने पार पडले आहेत. पण इतर राज्यातील दुसऱ्या लाटेचा वाढता प्रकोप पाहाता आता बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने मुंबईत घेऊ शकते. यासंबंधित मुंबईत तयारीस सुरुवात झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. त्याचे कारण मुंबईत कमालीचा घटक असलेला कोरोना संसर्ग आहे.
खेळाडूंना कोरोना, सामना स्थगित..
आयपीएलमधील ३०वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात अहमदनगरमध्ये खेळवला जाणार होता. पण केकेआर संघाच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने ३ मे रोजी खेळवला जाणारा हा सामना स्थगित करण्यात आला.
आयपीएलचे सामने तुलनेनं सुरक्षित मुंबईत!
- बीसीसीआय सुत्रांच्या माहितीनुसार, या आठड्यातच आयपीएलचे सामने मुंबईत स्थानांतरित केले जाऊ शकतात.
- कोलकाता आणि बेंगळुरुमध्ये सामने होणार नाहीत.
- प्लेऑफसह अंतिम सामना अहमदनगरमध्ये होणार नाही.
- यापुढील सर्व सामने मुंबईमध्ये खेळली जाऊ शकतात.
- परंतु अद्याप याची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आलेली नाही.
आयपीएलच्या हंगामात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आतापर्यंत १० सामने पार पडले आहेत. बीसीसीआयने पुढीस सामने मुंबईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला तर मुंबईतील ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील या स्टेडियममध्येही सामने खेळवले जातील. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईमध्ये खेळवले जाण्याचे नियोजन आहे. मात्र, कोरोनामुळे ते बदलले जाण्याची शक्यता आहे.