Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लठ्ठपणाची कारणं कळली, आता जीन्स थेरेपीतून होता येईल फिट!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
genes

मुक्तपीठ टीम

कोणी दोरीवरच्या उड्या मारते. लागोपाठ उड्या मारतच राहते. थोडंही न थांबता दोरी घुमतच राहते. तर कोणी धावताना दिसते. हळूहळू…पटपट जसं जमेल तसं. व्यायम सुरु असतातच उद्देश असतो एकच वजन कमी करण्याचा. आता मात्र त्यावर अक्सिर इलाज लवकरच सापडण्याची शक्यताय. कारण अमेरिकन संशोधकांना लठ्ठपणाचे कारण शोधण्यात मोठे यश मिळाले आहे. त्यांनी १४ जीन शोधली आहेत ज्यांच्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. ही जीन हृदयरोग आणि मधुमेह सारख्या आजारांना जबाबदार असल्याचे मानले जातात. एवढंच नाही तर शास्त्रज्ञांनी वजन वाढण्यास प्रतिबंध करणारी तीन जीन देखील ओळखली आहेत. संशोधकांनी लठ्ठपणाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा रोखण्यात कोणत्या जीनची भूमिका आहे याचा अभ्यास केला. पीएलओएस जेनेटिक्स जर्नलमध्ये अभ्यासाचे परिणाम प्रकाशित झाले आहेत. हा अभ्यास लठ्ठपणा, आहार आणि डीएनए यांच्यातील नवीन माहिती गोळा करण्यास मदत करतो.

 

सुस्त जीवनशैली वाढवते लठ्ठपणा

  • लठ्ठपणा वाढवण्यासाठी सुस्त जीवनशैली महत्वाची भूमिका बजावते.
  • संशोधकांच्या मते, साखरेसह उच्च-कॅलरीयुक्त आहारामुळे लठ्ठपणा जागतिक महामारीचे रूप धारण करत आहे.
  • चरबी साठवण्याच्या नियंत्रणासह, जीन आपल्या शरीरात ऊर्जा म्हणून अन्न वापरण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

 

अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठातील कला आणि विज्ञान महाविद्यालयातील संशोधक एलिन ओरूरक म्हणाले, “आम्हाला माहित आहे की लठ्ठपणा आणि इतर रोगांसह जगणाऱ्या लोकांमध्ये शेकडो भिन्न जीन निर्माण होण्याची शक्यता आहे.” संशोधकांनी लठ्ठपणाशी संबंधित २९३ जीनकडे पाहिले, यापैकी कोणत्या जीनमुळे समस्या उद्भवते किंवा प्रतिबंध होतो हे शोधण्याचे ध्येय आहे.

 

-वाईट दिनचर्या, चुकीचा आहार आणि तणावामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह खूप वेगाने पाय पसरत आहेत.
-एका अहवालानुसार, प्रत्येक चौथा माणूस लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. -कोरोना महामारीच्या युगात, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: fatfat peoplegenes therapyhealthmuktpeethआरोग्यजीन्स थेरीपीमुक्तपीठलठ्ठपणा
Previous Post

राज्यात २,०२६ नवे रुग्ण, दुपटीपेक्षा जास्त ५,३८९ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

एटीएममधून पैसे नाही, पण खात्यातून कापले तर बँकेकडून भरपाई!

Next Post
atm

एटीएममधून पैसे नाही, पण खात्यातून कापले तर बँकेकडून भरपाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!