Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेविरोधातील ईडीपिडा वाढली! ठाकरेनिष्ठ खोतकरांमागोमाग संजय राऊत लक्ष्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ed summons sanjay raut

मुक्तपीठ टीम

एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनाविरोधातील ईडीपिडा ही वाढली आहे. ठाकरेनिष्ठ असणाऱ्या शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनतर आता संजय राऊतांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लक्ष्य केले आहे. संजय राऊतांना मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याचे कळते. यावर संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया!

  • संजय राऊत यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
  • मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!जय महाराष्ट्र!

  • या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मेन्शनही केलं आहे.

मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a

— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022

याआधीही अर्जन खोतकरांवर ईडीची कारवाई!

  • ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची २०० एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे.
  • सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय.
  • या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ईडीने जप्त केलीय.

पत्राचाळ घोटाळा आहे तरी काय?

  • मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये पत्रा चाळ आहे.
  • त्या चाळींच्या पुनर्विकासाच्या मोठ्या प्रकल्पासाठी खूप स्पर्धा होती.
  • त्यात एचडीआयएलही सहभागी होती.
  • ही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १०३४ कोटींचा असल्याचे समजते.
  • याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
  • या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
  • राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.
  • शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
  • त्यानंतर संजय राऊत यांनी ते ५५ लाख परतही केले होते.
  • या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली.
  • संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
  • त्या व्यवहारातूनच हे प्रकरण थेट राऊतापर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे.

Tags: Arjun KhotkarEDMaharashtraPatra Chawl Casesanjay rautShivsenaअर्जुन खोतकरईडीपत्राचाळ घोटाळामहाराष्ट्रशिवसेनासंजय राऊत
Previous Post

एकनाथ शिंदे गटातील मंत्री आता बिनखात्याचे मंत्री! जाणून घ्या कोणते खाते कोणाकडे…

Next Post

गुवाहाटी ते मातोश्री…सारं काही स्वत:साठी!

Next Post
Eknath Shinde And Sanjay Raut

गुवाहाटी ते मातोश्री...सारं काही स्वत:साठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!