मुक्तपीठ टीम
एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनाविरोधातील ईडीपिडा ही वाढली आहे. ठाकरेनिष्ठ असणाऱ्या शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनतर आता संजय राऊतांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लक्ष्य केले आहे. संजय राऊतांना मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याचे कळते. यावर संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया!
- संजय राऊत यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
-
मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!जय महाराष्ट्र!
- या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मेन्शनही केलं आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
याआधीही अर्जन खोतकरांवर ईडीची कारवाई!
- ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची २०० एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे.
- सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय.
- या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ईडीने जप्त केलीय.
पत्राचाळ घोटाळा आहे तरी काय?
- मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये पत्रा चाळ आहे.
- त्या चाळींच्या पुनर्विकासाच्या मोठ्या प्रकल्पासाठी खूप स्पर्धा होती.
- त्यात एचडीआयएलही सहभागी होती.
- ही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १०३४ कोटींचा असल्याचे समजते.
- याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
- या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
- राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.
- शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
- त्यानंतर संजय राऊत यांनी ते ५५ लाख परतही केले होते.
- या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली.
- संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
- त्या व्यवहारातूनच हे प्रकरण थेट राऊतापर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे.