मुक्तपीठ टीम
अयोध्येत राम मंदिर साकारले जात असतानाच आता काशीमधील ज्ञानव्यापी मशिदीचा वाद पेटला आहे. दिल्लीतील तिघांच्या याचिकेनुसार न्यायालयाने या मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्या आदेशावर टीका करत एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा नव्वदच्या दशकातील अयोध्या रथयात्रा संघर्षासारखी स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या मेते तो आदेश १९९१च्या धार्मिक स्थळांना जसं आहे तसं ठेवण्याच्या कायद्याचंही उल्लंघन आहे.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालात असे म्हटले होते की, हा कायदा भारतीय राजकारणाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांचे संरक्षण करतो जे संविधानाच्या मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे.”असदुद्दीन ओवेसी यांचे विधान न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी केल्याच्या एका दिवसानंतर आले.
ज्ञानव्यापी मशीद प्रकरण
दिल्लीस्थित राखी सिंह, लक्ष्मी देवी, सीता साहू आणि इतरांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या शृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान आणि नंदी येथे दैनंदिन पूजा आणि विधी करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती.
१८ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी आपल्या याचिकेसह न्यायालयात धाव घेतली होती.
याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर, वाराणसी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयाने काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद संकुलातील शृंगार गौरी मंदिर आणि ईद नंतर आणि १० मे पूर्वी व्हिडीओग्राफी करण्याचे आदेश दिले.
६ मे आणि ७ मे रोजी मशिदीच्या आवारात व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षण होणार होते.
शृंगार गौरी मंदिराच्या संरचनेच्या प्रत्येक विटेचे सर्वेक्षण…
- दुपारी तीन वाजता, काशी विश्वनाथ धाम संकुलातील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात एकच गोंधळ उडाला, जेव्हा न्यायालयाचे आयुक्त आणि त्यांचे वकील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षकार मशिदीच्या पश्चिमेला पोहोचले आणि मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.
- मुख्य दरवाजातून भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता.
- आधीच उपस्थित असलेले विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी डॉ. सुनील कुमार वर्मा आणि डीएमचे प्रतिनिधी म्हणून आलेले एडीएम सिटी गुलाब चंद्रा यांनी सर्वेक्षण सुरू केले.
- कोर्ट कमिशनरने दोन सहकारी वकिलांसह सर्वेक्षण सुरू केले, जे सुमारे तीन तास सुरू होते.
- आयोगाच्या कामकाजादरम्यान गेटबाहेर मोठा गोंधळ झाला.
- दोन्ही बाजूंच्या लोकांचा जमाव जमला होता.